रेल्वेचा अजब कारभार! 'महालक्ष्मी' एक्स्प्रेसच्या प्रवाशांना बसणार मोठा फटका; प्रवासी संघटनांकडून आंदोलनाचा इशारा

Last Updated:

Kolhapur News : कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूरदरम्यान धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि तिरुपती हरिप्रीया एक्स्प्रेसमधील प्रवाशांची संख्या कमी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मध्य रेल्वे या...

Mahalaxmi Express
Mahalaxmi Express
Kolhapur News : कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूरदरम्यान धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि तिरुपती हरिप्रीया एक्स्प्रेसमधील प्रवाशांची संख्या कमी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मध्य रेल्वे या गाड्यांमधून स्लीपरचे तीन डबे कमी करून त्याऐवजी वातानुकूलित (AC) 'थ्री टायर' डबा जोडण्याचा निर्णय घेण्याचा प्रयत्नात आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेले तब्बल सव्वादोनशे बर्थ कमी होणार असून, या निर्णयाला रेल्वे प्रवासी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष
महालक्ष्मी एक्स्प्रेस ही मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे. ही गाडी रोज रात्री ८.५० वाजता कोल्हापूरहून निघते आणि प्रवाशांकडून तिला नेहमीच मोठा प्रतिसाद मिळतो. वर्षभर या गाडीचे तिकीट ‘प्रतीक्षा यादी’ (waiting list) मध्ये असते. अशा परिस्थितीत डबे वाढवण्याऐवजी ते कमी करण्याचा निर्णय अत्यंत संतापजनक असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. या रेल्वेला यापूर्वी जादा एलएचबी कोच जोडले होते, ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळत होता. पण आता हा नवीन निर्णय प्रवाशांची गैरसोय करणारा आहे.
advertisement
प्रवासी संघटनांची मागणी
कोल्हापूर-सांगली रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सदस्य उदयसिंह निंबाळकर यांनी सांगितले की, “महालक्ष्मी एक्स्प्रेसला दोन डबे वाढवण्याची मागणी असताना, आता तीन आरक्षित डबे कमी करणे अन्यायकारक आहे. हा निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल.”
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य सुहास गुरव यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरहून मुंबईला जाणारी ही एकमेव थेट रेल्वे आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांनी प्रशासनाकडे आणखी दोन आरक्षित स्लीपर डबे वाढवण्याची मागणी केली आहे, तसेच पुण्यापर्यंत धावणारी सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत वाढवण्याचीही मागणी केली आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रेल्वेचा अजब कारभार! 'महालक्ष्मी' एक्स्प्रेसच्या प्रवाशांना बसणार मोठा फटका; प्रवासी संघटनांकडून आंदोलनाचा इशारा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement