राजधानी हादरली! भल्या पहाटे सिग्मा गँगच्या 4 गुंडांचं पोलिसांकडून एन्काऊंटर

Last Updated:

Sigma Gang Encounter: ऐन दिवाळीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे पोलिसांनी मोठं एन्काऊंटर केलं आहे. यात सिग्मा गँगच्या चार गुंडांचा मृत्यू झाला आहे.

News18
News18
सध्या देशभर दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जातोय. पण आता ऐन दिवाळीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे पोलिसांनी मोठं एन्काऊंटर केलं आहे. यात सिग्मा गँगच्या चार गुंडांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सिग्मा गँगच्या म्होरक्याचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. ऐन दिवाळीत अशाप्रकारे एन्काऊंटरची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एकीकडे दिवाळीची आतषबाजी सुरू असताना राजधानी दिल्ली गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे. दिल्लीतील रोहिणी येथे पोलिसांनी मोठी चकमक केली. दिल्ली पोलिसांच्या कारवाईत बिहारच्या सिग्मा टोळीतील चार मोस्ट वॉन्टेड गुंड ठार झाले. मृतांमध्ये बिहारच्या सीतामढी येथील रहिवासी सिग्मा टोळीचा प्रमुख रंजन पाठक याचाही समावेश होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या पथकाला हे सर्व गुंड रोहिणी परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
advertisement
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ आणि २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे २:२० वाजता दिल्लीच्या रोहिणी परिसरातील डॉक्टर आंबेडकर चौक आणि पानसाळी चौक दरम्यान बहादूर शाह मार्गावर बिहार पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाची चार संशयित गुन्हेगारांसोबत चकमक झाली. चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. त्यानंतर, हे चारही गुंड दिल्ली पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडले.
advertisement
चकमकीनंतर, सर्व आरोपींना दिल्लीच्या रोहिणी येथील डॉ. बीएसए रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी चारही गुंडांना मृत घोषित केले. रंजन पाठक (वय 25 वर्षे, सीतामढी जिल्हा, बिहार), बिमलेश महातो उर्फ ​​बिमलेश साहनी (वय 25 वर्षे, रा. रतनपूर), मनीष पाठक (वय 33 वर्षे रा. मलाहाई) आणि अमन ठाकूर (वय 21 वर्षे, रा. शेरपूर, दिल्ली) असं चकमकीत मृत पावलेल्या गुंडांची नावं आहेत. हे सर्व आरोपी बिहारमधील अनेक गंभीर गुन्ह्यांमधील मोस्ट वॉण्टेड आरोपी आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
राजधानी हादरली! भल्या पहाटे सिग्मा गँगच्या 4 गुंडांचं पोलिसांकडून एन्काऊंटर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement