रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचं नाशिक कनेक्शन,अल्पवयीन मुलाला घेतलं ताब्यात

Last Updated:

मुक्ताईनगर व वरणगाव शिवारातील पेट्रोल पंपांवर टाकलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांची टोळी जेरबंद केली आहे

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव :  केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. मुक्ताईनगर, वरणगाव येथील तीन पेट्रोल पंपांवर दरोडा टाकून 1.33 लाखांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला होता. या प्रकरणी नाशिक येथून पाच आरोपींना अटक तर एक विधी संघर्षित बालकाला नाशिकमधून ताब्यात घेतले आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व वरणगाव शिवारातील पेट्रोल पंपांवर टाकलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांची टोळी जेरबंद केली आहे. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारे आरोपीही अटकेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती. 9 ऑक्टोबरच्या रात्री मुक्ताईनगर येथील रक्षा टोफ्युअल, कर्की फाटा येथील मनुभाई आशीर्वाद, आणि वरणगावजवळील तळवेल फाटा येथील सय्यद पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकण्यात आला होता.
advertisement

आरोपी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात

आरोपींनी रोख रक्कमसह मोबाईल आणि सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण 1 लाख 33  हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष तपास पथक तयार केले होते. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पथकांनी नाशिक व अकोला येथे छापे टाकून सचिन भालेराव, पंकज गायकवाड, हर्षल व देवेंद्र बावस्कर, प्रदुम्न विरघट आणि एका विधी संघर्षित बालकाला अटक केली. सध्या सर्व आरोपी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
advertisement

बंदुकीचा धाक दाखवत पंपावरची रक्कम केली लंपास

पहाटेच्या सुमारास पाच दरोडेखोर मोटरसायकलवरून आले. यावेळी या दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांच्याकडील रोकड लुटून नेली. दरोडेखोरांनी सुमारे एक लाख रुपयांची रोकड लंपास केली. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीची तोडफोड केली होती.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचं नाशिक कनेक्शन,अल्पवयीन मुलाला घेतलं ताब्यात
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement