आमिष असे की हल्दीरामचा मालकही फसला, 9.38 कोटींचा गंडा; मुंबईतल्या ठगांचा मास्टरप्लान, थरारक गूढ डील
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
हल्दीराम फूड्सचे संचालक कमल अग्रवाल यांची तब्बल ९.३८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मुंबईतील चार जणांनी उच्च परताव्याचं आमिष दाखवत त्यांच्याकडून ही रक्कम उकळली.
मुंबई: कल्पना करा, एक असा ब्रँड ज्याचे स्नॅक्स घराघरात प्रसिद्ध आहेत आणि त्या ब्रँडच्या मालकासोबत कोणी कोट्यवधींची फसवणूक केली आहे. हे वाचूनच तुम्हाला विचित्र वाटेल की एवढ्या मोठ्या ब्रँडच्या मालकासोबत असे कोण करू शकते? आणि एवढा मोठा उद्योजक इतक्या सहज कसा काय अमिषाला बळी पडू शकतो? पण अलीकडेच एक असाच प्रकार समोर आला आहे. देशातील प्रसिद्ध मिठाई आणि स्नॅक्स बनवणाऱ्या हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे संचालक कमल अग्रवाल यांच्यासोबत जवळपास 9.38 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
मुंबईतील चार जणांनी कमल अग्रवाल यांना बनावट गुंतवणूक योजनेत मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवले आणि त्याच निमित्ताने कोट्यवधी रुपये उकळले. हा प्रकार नागपूरच्या कलमणा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. PTIने पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
पोलिसांनी सुरू केली तपासणी
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार- कमल अग्रवाल जे स्वतः ओम इंडस्ट्रीज नावाची कंपनी चालवतात. त्यांच्यासोबत फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःला ‘रॉयल ड्रायफ्रूट प्रायव्हेट लिमिटेड’ नावाच्या एका सुके मेवेच्या कंपनीशी संबंधित असल्याचे भासवले. त्यांनी कमल अग्रवाल यांना 76% हिस्सेदारी देण्याचे आमिष दाखवले आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.
advertisement
कलमणा पोलिसांनुसार- ज्यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. त्यामध्ये मुंबईच्या बांद्रा येथील समीर अब्दुल हुसैन ललानी, त्यांची पत्नी हीना ललानी, मुलगा अलीशान ललानी आणि ठाण्याच्या कल्याण भागातील प्रकाश भोसले यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बनावट कागदपत्रांवर जिंकला विश्वास
फसवणुकीची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा आरोपींनी कमल अग्रवाल यांच्या गुंतवणूक सल्लागाराशी संपर्क साधला. त्यांनी बनावट बॅलन्स शीट्स, खोटे व्यवसाय रेकॉर्ड आणि फसवे कागदपत्र दाखवून गुंतवणुकीचा विश्वास संपादन केला. आरोपींनी अग्रवाल यांना सांगितले की जर त्यांनी 12.5 कोटी रुपये गुंतवले, तर त्यांना कंपनीत 35% हिस्सेदारी मिळेल. त्यानंतर जानेवारी ते जून 2023 दरम्यान कमल अग्रवाल यांनी ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून विविध हप्त्यांमध्ये सुमारे 4.5 कोटी रुपये ट्रान्सफर केले. एकूण मिळून त्यांनी 9.38 कोटी रुपये गुंतवले. या आश्वासनावर की त्यांना 76% हिस्सेदारी मिळेल.
advertisement
जेव्हा अग्रवाल यांना या संपूर्ण व्यवहारात काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. तेव्हा त्यांनी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची खरी चौकशी केली. चौकशीत हे समोर आले की सर्व कागदपत्रे बनावट होती आणि संपूर्ण गोष्ट खोट्या पायावर उभी होती. त्यानंतर कमल अग्रवाल यांनी नागपूरच्या कलमणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 13, 2025 3:53 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
आमिष असे की हल्दीरामचा मालकही फसला, 9.38 कोटींचा गंडा; मुंबईतल्या ठगांचा मास्टरप्लान, थरारक गूढ डील








