Crime: आंतरधर्मीय विवाह केल्याने तरूणाची हत्या; पुण्यात 'सैराट'ची पुनरावृत्ती
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
आंतरधर्मीय विवाह आणि त्यातून होणार अपराधे आपणास नवे नाहीत. पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरधर्मीय विवाह केल्याने तरूणाची हत्या करण्यात आली आहे. खरंतर ही सैराटची पुनरावृत्ती आहे....
पुणे: आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह आणि त्यातून घडणाऱ्या हत्येच्या घटना समाजात वाढत आहेत. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहर एका अशाच हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. एका साडूने आपल्या साडूचीच हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आंतरधर्मीय विवाह केला म्हणून मुलाची हत्या करण्यात आल्याचं समजतं आहे.
नेमका प्रकार काय? हा ऑनर किलिंगचाच प्रकार आहे, अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे ‘सैराट’ चित्रपटासारखाच हा प्रकार आहे. पिंपरी-चिंचवडमधील या घटनेत तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अशा हत्या खुलेआम करणाऱ्या गुंडांना पोलिसांचं काय भय राहिलं की नाही, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. लोक आजही धर्म, जात या जोखडात अडकलेली दिसत आहेत. त्यातून अशा गंभीर आणि धक्कादायक हत्येच्या घटना घडत आहेत.
advertisement
आरोपीने मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळून तुकडे स्वरूपातील अवशेष नदीपात्रात फेकले. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील आदर्श नगर येथे 15 जूनला ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती मिळतं आहे. या प्रकरणात अमीर शेख या 25 वर्षाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत अमीर शेख याने पंकज विश्वनाथ पाईकराव याच्या बायकोच्या बहिणीसोबत आंतरधर्मीय लग्न केलं होतं. याचाच राग मनात धरून पंकज विश्वनाथ पाईकराव याने आपल्या मेहुण्यांच्या मदतीने हे कृत्य केलं.
advertisement
पोलीस तपास सुरू: या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील चारही आरोपींच्या विरोधात भादवि कलम 364, 302, 201, 120 ब आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे. तर गणेश दिनेश गायकवाड हा आरोपी अजूनही फरार आहे.
advertisement
या खूनाच्या गटनेबाबत अधिकची माहिती अशी आहे की, आरोपी पंकज विश्वनाथ पाईकराव याने आपला मेहुना सुशांत गोपाळ गायकवाड, गणेश दिनेश गायकवाड आणि त्यांचा मित्र सुनील किशन चक्रनारायण याच्या मदतीने 15 जूनला अमीर मोहम्मद शेख याला दारू पिण्यासाठी बोलवलं. आरोपींनी मोशीमधील आदर्श नगर येथून मृतकाचं अपहरण केलं आणि तिथेच त्याची हत्या केली. या प्रकरणात पोलीस अधिकचा कसून तपास करत आहेत. या नराधम गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पुढे पोलीस तपासातून आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 09, 2024 10:30 PM IST


