advertisement

Nagpur Crime News : नागपुरात विकृतीची सीमा ओलांडली, घोडीवर अत्याचाराची घटना, नराधमाला अटक

Last Updated:

Nagpur Crime News : राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटना उघडकीस येत असताना दुसरीकडे नागपूरमध्ये थेट घोडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

Crime news
Crime news
राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटना उघडकीस येत असताना दुसरीकडे नागपूरमध्ये थेट घोडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एका 30 वर्षीय नराधमाने घोडीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्ना ऐरणीवर असताना आता विकृतांमुळे प्राण्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागपूरमध्ये विकृतीचा कळस गाठणारी एक घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील घोडेस्वारी अकादमीमध्ये ही घटना घडली. या अकादमीतील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आली. छोट्या सुंदर खोब्रागडे असं या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
advertisement

CCTV मुळे विकृत घटना उघड

नागपूरमधील खाणी परिसरातही ही घोडेस्वारी अकादमी आहे. 17 मे रोजी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकाने या अकादमीच्या आवारात एक संशयास्पद व्यक्ती पाहिली. त्यानंतर त्याची माहिती सुरक्षा रक्षकाने अकादमी संचालकांना दिली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये आरोपीने अकादमीमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या एका घोडीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
advertisement
या प्रकरणाची माहिती पोलिसांना देताच त्यांनी आपली तपासचक्रे वेगाने फिरवली आणि आरोपीला अटक केली. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Nagpur Crime News : नागपुरात विकृतीची सीमा ओलांडली, घोडीवर अत्याचाराची घटना, नराधमाला अटक
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement