'हल्ला केला आता घरात घुसू', नागपूर दंगलीमागं बांगलादेश कनेक्शन, तपासात नवा ट्वीस्ट

Last Updated:

Riots in Nagpur: नागपूर दंगल प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या दंगलीमागे बांगलादेशी कनेक्शन असल्याचं समोर आली आहे.

News18
News18
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद नागपूरमध्ये उमटले. इथं दोन गटात मोठी दंगल उसळल्याचं बघायला मिळालं. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत, जाळपोळ आणि तोडफोड केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजुच्या जवळपास ५० हून अधिक जणांना अटक केली आहे. याप्रकरणी काही जणांवर पोलिसांनी देशद्रोहाचा कलम देखील लागू केलं आहे.
एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरू असताना आता नागपूर दंगल प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या दंगलीमागे बांगलादेशी कनेक्शन असल्याचं समोर आली आहे. नागपूर पोलिसांच्या सायबर सेलच्या तपासात चिथावणीखोर पोस्ट बांगलादेश मधून व्हायरल करण्यात आल्याचं समोर आलं आहे. दंगलीच्या आधी सोशल मीडियावर काही चिथावणीखोर पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. यात नागपूरमधील एका तरुणाने देखील अशीच चितावणीखोर पोस्ट केली होती.
advertisement
"हल्ला केला आता घरात घुसू" असा उल्लेख असलेली पोस्ट नागपूरमधील तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. पोलीस तपासात या तरुणाला ही पोस्ट कुठून आली याचा शोध घेतला असता, सदर पोस्ट बांगलादेश मधून आल्याचं समोर आलं आहे. दंगलीच्या दिवशीच नागपूर पोलिसांनी या पोस्टचा मास्टरमाइंड शोधत संबंधित अकाऊंट ब्लॉक केलं होतं. भडकावू पोस्ट व्हायरल करणार बांगलादेशी अकाउंट ब्लॉक केल्याने राज्याच्या इतर भागात भडकावू पोस्ट व्हायरल न झाल्याने या प्रकाराला जागेवरच अटकाव करण्यात यश आलं होतं, अशी माहिती पोलीस सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे.
advertisement
नागपूर दंगलप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नागपूर दंगलीमधील आरोपींविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आरोपींविरोधात नागपूर दंगल प्रकरणात आरोपी फहिम खान आणि इतर आरोपींवर BNS 152 अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल घडवण्यास प्रवृत्त करणारे ते 172 व्हिडीओ सायबर पोलीसांच्या हाती लागले आहेत. CCTV आणि व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'हल्ला केला आता घरात घुसू', नागपूर दंगलीमागं बांगलादेश कनेक्शन, तपासात नवा ट्वीस्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement