गुप्तांगावर चावून केलं रक्तबंबाळ, नागपुरच्या तुरुंगात कैद्याचा भयंकर कांड, बरॅकमध्ये आक्रोश अन् किंचाळ्या
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Nagpur Crime News: नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या गुप्तांगावर चावा घेतला आहे.
Nagpur Crime News: नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या गुप्तांगावर चावा घेतला आहे. हा चावा इतका भयंकर होता, की संबंधित कैदी रक्तबंबाळ झाला आहे. आरोपी कैद्याने चावा घेतल्यानंतर बराकमध्ये एकच आक्रोश आणि किंचाळ्या ऐकू आल्या. यानंतर तुरुंगातील सुरक्षारक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी कैद्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याप्रकरणी चावा घेणाऱ्या कैद्यावर धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कृष्णा रमेश तिवारी असं गुन्हा दाखल झालेल्या 26 वर्षीय कैद्याचं नाव आहे. तो अंबाझरी येथील रहिवासी आहे. तर शुभम ठाकूर असे जखमी कैद्याचे नाव असून, त्याच्यावर सध्या कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं प्रकरण काय?
घटनेच्या दिवशी शुभम ठाकूर हा बरॅकमध्ये झोपला होता. यावेळी आरोपी कैदी कृष्ण तिवारी तिथे आला. त्याने मोठ्याने आरडाओरड करत त्याला उठवले. झोपमोड झाल्याने चिडलेल्या शुभमने कृष्णाला चापट मारली. त्यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ आणि हाणामारी सुरू झाली. हाणामारीच्या दरम्यान आरोपी कृष्ण तिवारीने याने अमानुष कृत्य करत शुभम ठाकुरच्या गुप्तांगावर दाताने चावा घेतला.
advertisement
हा चावा इतका भयंकर होता की, यात शुभम गंभीर जखमी झाला. शुभमच्या किंचाळ्या ऐकून सुरक्षारक्षकांनी बरॅकमध्ये धाव घेतली. यावेळी दोघंही एकमेकांना मारहाण करत होते. सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत दोघांना वेगळे केले. तसेच जखमी शुभम ठाकूर याला तातडीने कारागृहातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तुरुंगात घडलेल्या या प्रकाराची दखल धंतोली पोलिसांनी घेतली आहे. धंतोली पोलिसांनी मारहाण आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या कलमांतर्गत कृष्णा तिवारी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
Jul 19, 2025 11:13 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
गुप्तांगावर चावून केलं रक्तबंबाळ, नागपुरच्या तुरुंगात कैद्याचा भयंकर कांड, बरॅकमध्ये आक्रोश अन् किंचाळ्या










