'मी सिनेमापासून दूर होतोय...' बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकणार आमिर खान? व्यक्त केली भीती

Last Updated:

आमिर खानने फिल्मी दुनियेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आमिर खानने मोठ्या पडद्यावर पुनरागमन करावं अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. पण आता त्याच्या याच चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे.

आमिर खान
आमिर खान
मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान आमिर खानने आपल्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंचर आमिर बॉलिवूडमध्ये दिसलेला नाही. त्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. त्यानंतर आमिर खानने फिल्मी दुनियेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आमिर खानने मोठ्या पडद्यावर पुनरागमन करावं अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. पण आता त्याच्या याच चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे.
सुपरस्टार आमिर खान लवकरच 'सीतारे जमीन पर' या चित्रपटात दिसणार आहे. यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. पण अलीकडेच आमिर खानने आपण चित्रपट जगतापासून दूर होत असल्याचा खुलासा केला आहे.
सलमानची प्रेयसी नाही तर बहीण होणार होती ऐश्वर्या; पण सुपरस्टारमुळं थोडक्यात वाचला भाईजान
सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती अभिनयाच्या जगापासून दूर आहे. आता ती या आघातातून बाहेर आली असून, तिला कोणी काम देत नाही. आता अभिनेत्रीनं स्वतःचं पॉडकास्ट सुरू केलं आहे, ज्यात नुकतंच आमिर खानने हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्येच आमिरने एक भीती व्यक्त केलीय. त्याविषयी बोलताना तो भावुक झालेला पाहायला मिळाला.
advertisement
रियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये आमिर खान बॉलिवूड सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. . या व्हिडिओमध्ये तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी एका खऱ्या स्टार आणि सच्चा मित्र आमिर खानचं स्वागत करते. या काळात मी तुम्हाला त्यांचा अनुभव सखोलपणे सांगणार आहे. ही गोष्ट जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत रहा. #Chapter2, भाग शुक्रवार, 23 ऑगस्ट रोजी येईल.
advertisement
advertisement
रिया चक्रवर्तीने यात आमिर खानला, 'जेव्हा तो आरशात पाहतो तेव्हा तो किती देखणा दिसतो याचं आश्चर्य वाटतं का?' असा प्रश्न विचारला. या प्रश्नाच्या उत्तरात आमिर म्हणाला, 'मी स्वत:ला इतका सुंदर मानत नाही कारण मी तसा दिसत नाही. शाहरुख खान, सलमान खान आणि हृतिक रोशन हे खरे स्टार आहेत.'
advertisement
या शोदरम्यान आमिरने त्याला काही चित्रपटातून माघार घ्यावी लागल्याचा खुलासा केला आहे. पण यावर रियाचा विश्वास बसत नाही. यानंतरच काही विषयांवर बोलताना आमिर खान भावूक झाल्याचा आणि रडू लागल्याचंही या व्हिडिओमध्ये दिसलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मी सिनेमापासून दूर होतोय...' बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकणार आमिर खान? व्यक्त केली भीती
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement