Abhijeet Sawant: अभिजीत सावंत बिग बॉसनंतर 'या' रिॲलिटी शोमध्ये झळकणार, Video आला समोर!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Abhijeet Sawant: अभिजीत सावंत बिग बॉस मराठी 5 पासून खूप चर्चेत आहे. तो बिग बॉसची ट्रॉफी जिंकला नाही, मात्र त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. तो घरात असतानाही सतत लाइमलाईटमध्ये असायचा आणि घराबाहेरही तो चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
मुंबई : अभिजीत सावंत बिग बॉस मराठी 5 पासून खूप चर्चेत आहे. तो बिग बॉसची ट्रॉफी जिंकला नाही, मात्र त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. तो घरात असतानाही सतत लाइमलाईटमध्ये असायचा आणि घराबाहेरही तो चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच अभिजीतविषयी नवी माहिती समोर आली आहे. बिग बॉसनंतर अभिजीत आणखी एका रिॲलिटी शोमध्ये झळकणार आहे. त्याचा एक प्रोमो व्हिडिओही समोर आलाय.
आपल्या आवाजाने सगळ्या प्रेक्षकांना वेड लावणारा अभिजीत सावंत आता 'मी होणार सुपरस्टार उस्ताद' या रिॲलिटी शोमध्ये झळकणार आहे. या शोच्या महाअंतिम सोहळ्याला तो हजेरी लावणार असून याचा प्रोमो व्हिडिओ व्हायरल होतोय.
'मी होणार सुपरस्टार उस्ताद-छोटे उस्ताद' तिसऱ्या सीझनचा महाअंतिम सोहळा होणार आहे. शनिवार, 9 आणि रविवार, 10 नोव्हेंबरला हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी अभिजीत सावंतची खास हजेरी लावणार आहे. तो त्याच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात गाणीही गाताना दिसणार आहे. प्रोमो आऊट होताच अभिजीतचे चाहते त्याला पुन्हा एकदा रिॲलिटी शोमध्ये गाताना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
advertisement
advertisement
दरम्यान, अभिजीत सावंत बिग बॉस मराठी 5 च्या टॉप 2 मध्ये पोहोचला. मात्र ट्रॉफी त्याच्या हातून निसटली. यंदाच्या सीझनचा विनर गोलीगत सूरज चव्हाण ठरला. सूरजसोबत अभिजीत सावंतलाही लोकांचं प्रेम मिळालं. आता अभिजीत पहिल्यापेक्षा जास्त सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. तो त्याच्याविषयी नवनवीन अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 07, 2024 7:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Abhijeet Sawant: अभिजीत सावंत बिग बॉसनंतर 'या' रिॲलिटी शोमध्ये झळकणार, Video आला समोर!






