'प्रभास जोकर दिसला...' कल्की 2898 एडी' वर बॉलिवूड अभिनेत्यानं साधला निशाणा; संतापले चाहते
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटातील सगळ्यांच्याच भूमिकांचं कौतुक झालं. पण हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेता अर्शद वारसीने प्रभासवर निशाणा साधला आहे.
मुंबई : प्रभासचा कल्की 2898 एडी 27 जून रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून अनेक मोठे विक्रम मोडले आणि या वर्षातील 1000 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला. प्रभाससोबतच दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांनीही या चित्रपटात आपल्या अभिनयाने छाप पाडली. ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटातील सगळ्यांच्याच भूमिकांचं कौतुक झालं. पण हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेता अर्शद वारसीने प्रभासवर निशाणा साधला आहे.
अर्शद वारसीची एक छोटी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत अर्शद वारसीला, त्याने पाहिलेला शेवटचा चित्रपट कोणता?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यानं ‘कल्की 2898 एडी’ असे उत्तर दिलं. तो पुढे म्हणाला, 'पण मला तो आवडला नाही. प्रभास, माफ कर, पण तो जोकरसारखा दिसत होता. मला काही समजलंच नाही.' असं उत्तर त्यानं दिलं आहे. अर्शद वारसीच्या या वक्तव्यावर अनेक चाहते संताप व्यक्त करत आहेत, तर अनेकांनी त्याला पाठींबा देखील दिला आहे.
advertisement
अर्शद वारसीच्या या वक्तव्यानंतर प्रभासचे चाहते संतापले आहेत. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अर्शद वारसीला त्याच्या या वक्तव्यामुळे प्रचंड ट्रोल केले जात आहे.
अर्शद वारसीच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा साऊथ विरुद्ध बॉलीवूड असा सामना पाहायला मिळत आहे. एकीकडे प्रभासचे चाहते त्याला सपोर्ट करत आहेत. त्यामुळे अर्शद वारसीच्या बाजूने काही लोक आहेत. सोशल मीडियावर “हे लोक नवीन शैलीतील चित्रपटांना प्रमोट करू शकत नाहीत किंवा कलाकारांना देखील पाठींबा देऊ शकत नाहीत. या विचारसरणीमुळे बॉलिवूड अपयशी ठरत आहे.'' असा आशयाच्या कमेंट केल्या आहेत.
advertisement
Here it is, The real view of #Kalki2898AD from north India. #Prabhas looks like Joker in the film says Arshad. He also added kalki could have been a good film like Mad Max but the actor and director failed to do so.
pic.twitter.com/hbEWMOyyj7— Movie Hub (@Its_Movieshub) August 18, 2024
advertisement
अर्शद वारसीच्या समर्थनार्थ काही लोक पुढे आले आहेत. त्याला पाठींबा देत काहींनी “लोक अर्शद वारसीला सत्य बोलल्याबद्दल ट्रोल करत आहेत. कल्कीला पाहिल्यानंतर माझी प्रतिक्रियाही अशीच होती. चित्रपटाबाबत कमालीची हाईप आहे. लोकांच्या मनात काय चालले आहे ते तो सांगत आहे.” असं म्हटलं आहे.
मात्र, अद्याप याप्रकरणी प्रभास किंवा 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. सोशल मीडियावर चाहते आपापसात भांडताना दिसत आहेत. मात्र, प्रभासच्या या वक्तव्यामुळे त्याचे चाहते चांगलेच संतापले आहेत. त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2024 7:39 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'प्रभास जोकर दिसला...' कल्की 2898 एडी' वर बॉलिवूड अभिनेत्यानं साधला निशाणा; संतापले चाहते