advertisement

लता दीदींच्या सेक्रेटरीसोबत पळाली गायिका, 16व्या वर्षी लग्न; 3 मुलांच्या जन्मानंतर मोडलं लग्न

Last Updated:

स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या सेक्रेटरीसोबत ही गायिका पळून जाऊन लग्न केलं. त्यानंतर इंडस्ट्रीत खूप चर्चा झाल्या. मात्र काही वर्षात हे लग्न मोडलं.

News18
News18
मुंबई : भारतीय संगीतक्षेत्रात मानाचं स्थान मिळवणाऱ्या गायिकेनं लता दीदींच्या सेक्रेटरीशी लग्न केलं. अत्यंत लहान वयात ती त्यांच्यासोबत पळून गेली. त्यांचा संसार सुरू झाला. तीन मुलं झाली आणि अखेर त्यानंतर त्यांचं लग्न फिस्कटलं. त्यांच्या नात्यात दुरावा आला. प्रेग्नंट असलेली गायिका सासर सोडून माहेरच्या दारात आली.
आपण बोलत आहोत ते आशा भोसले यांच्याबद्दल. आशा ताईंनी 16 व्या वर्षी लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी गणपत राव भोसले यांच्यासोबत घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं. त्या काळात ही घटना खूप चर्चेत आली होती. त्यानंतर अनेक वर्ष लता दीदींनी आशा ताईंशी अबोला धरला होता.
advertisement

तीन मुलं, पण नातं टिकू शकलं नाही

आशा आणि गणपत यांना तीन मुलं झाली. मात्र, लग्नानंतर त्यांच्या वैवाहिक नात्यात वाद सुरू झाले. गणपत राव आशावर संशय घेत असे आणि तिला पैशासाठी त्रास देत असे. परिस्थिती इतकी बिघडली की जेव्हा आशा ताई तिसऱ्यांदा आई होणार होत्या आणि तेव्हा गणपत राव यांनी त्यांना घर सोडायला लावलं.
advertisement

लता मंगेशकर झाल्या नाराज, नातंही तोडलं

आशा भोसले यांनी घरातून पळून जाऊन लग्न केल्यामुळे लता मंगेशकर खूपच नाराज झाल्या होत्या. त्यांनी काही काळ आशाशी सर्व संबंध तोडले होते. मात्र नंतर आशा ताई आई झाल्यावर कुटुंबाने तिला पुन्हा स्वीकारलं. गणपत रावपासून वेगळं झाल्यानंतर आशा भोसले आपल्या आई आणि लता मंगेशकर यांच्याकडे परत आल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा गायनात लक्ष घालायला सुरुवात केली.
advertisement

आर.डी. बर्मनसोबत दुसरं लग्न

कामाच्या निमित्ताने आशा भोसले यांची भेट संगीतकार आर.डी. बर्मन यांच्यासोबत झाली. दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. आशा भोसले वयाने आर.डी. बर्मनपेक्षा 6 वर्षांनी मोठ्या होत्या.  त्यामुळे बर्मन कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हतं. तरीही दोघांनी 1980 मध्ये विवाह केला.
आशा भोसले यांचं वैयक्तिक आयुष्य जितकं रंगतदार होतं तितकंच त्यांच्या गाण्यांचं सामर्थ्य आजही लोकांच्या मनात आहे. त्यांचा प्रवास म्हणजे संघर्ष, प्रेम आणि यश यांचं सुंदर मिश्रण आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
लता दीदींच्या सेक्रेटरीसोबत पळाली गायिका, 16व्या वर्षी लग्न; 3 मुलांच्या जन्मानंतर मोडलं लग्न
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement