Govinda News: "रस्त्यात कधी माझ्या तावडीत सापडला ना, तर..." धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटामुळे गोविंदाची सटकली, थेट करण जोहरला धमकी
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
गोविंदा अहुजाने 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाबद्दल निर्माता करण जोहरवर टीका केली आहे. अभिनेत्याने गोविंदाला एका मुलाखतीमध्ये महत्त्वाचा इशारा दिला आहे, नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय? जाणून घेऊया...
बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहणार्या गोविंदाने बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहरवर जोरदार टीका केली आहे. 2022 साली रिलीज झालेल्या 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली होती. गोविंदा अहुजाने या चित्रपटाबद्दल निर्माता करण जोहरवर अनेक टीका केलेल्या आहेत. अभिनेत्याने गोविंदाला एका मुलाखतीमध्ये महत्त्वाचा इशारा दिला आहे, नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय? जाणून घेऊया...
अलीकडेच गोविंदाने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरवर अनेक आरोप केले आहेत. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवण्यात आलेला 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपट माझ्या खासगी आयुष्यावर बनवण्यात आल्याचा आरोप गोविंदाने केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप गोविंदाने करण जोहरवर केला आहे. अभिनेत्याच्या नावाचा गैरवापर केल्यामुळे अभिनेत्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्याच्या मते, 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाची स्टोरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि पती- पत्नीच्या वादावर बेतलेली असल्याचे त्याने सांगितले आहे.
advertisement
गोविंदाने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "माझ्यामध्ये आणि सुनीतामध्ये जो वाद झाला आहे, त्याचा गैरफायदा घेण्यात आला आहे. कोणीतरी माझ्या नावाचा वापर करून, चित्रपट बनवला आहे. 'माय नेम इज गोविंदा' की 'गोविंदा नाम मेरा' अशा नावाचा चित्रपट काढण्यात आला आहे. माझ्या लक्षात नाहीये, पण मला असं वाटतं की, तो चित्रपट करण जोहरचाच आहे. त्या चित्रपटाचा विषय असा आहे की, पती-पत्नीमध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळे (गर्लफ्रेंड) भांडणं होतात आणि मग ते एकमेकांवर संशय घेऊ लागतात. कधी-कधी हे लोकं एखाद्याच्या खासगी आयुष्यातील गोष्टी जबरदस्तीनं चित्रपटात घुसवण्याचा प्रयत्न करतात."
advertisement
मुलाखतीमध्ये गोविंदाने करण जोहरला एक धमकी वजा इशाराही दिला आहे. गोविंदा इशारा देताना म्हणाला की, "जर मला तो (करण जोहर) रस्त्यात कधी माझ्या तावडीत सापडला ना, तर रजनीकांत यांच्या स्टाइलमध्ये मी त्यांना लोकांसमोर 'प्रसाद' देईन. मी हात जोडून विनंती करतो की, कृपया कोणीही माझ्यासोबत गैरवर्तन करू नका. मी विनंती करतो की, प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी विनोद चांगले वाटत नाहीत." गोविंदाने दिलेली ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली आहे. गोविंदाने करणला दिलेल्या इशाऱ्यावर अद्याप तरीही करणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. घडलेल्या प्रकारावर करण काय प्रतिक्रिया देतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 3:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Govinda News: "रस्त्यात कधी माझ्या तावडीत सापडला ना, तर..." धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटामुळे गोविंदाची सटकली, थेट करण जोहरला धमकी







