'आता विषय सुरू झालाय', घराबाहेर काढल्यानंतर दिव्या शिंदे सीक्रेट रूममध्ये? नव्या VIDEO मध्ये 'सरकार'चा इशारा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Divya Shinde: बिग बॉस मराठी ६ मधून बाहेर पडताच दिव्याने जो पवित्रा घेतलाय, तो पाहता असं वाटतंय की घरात सुरू झालेला हा वाद शांत होण्याऐवजी आता अधिकच पेटणार आहे.
मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या घरात अनेक वाद झाले, पण दिव्या शिंदेच्या प्रकरणाने जो थरार निर्माण केला, तो कदाचित या सिझनचा सर्वात मोठा धमाका ठरला आहे. घरातील सदस्यांना "बाहेर गेल्यावर तलवार चालवेन" अशी धोकादायक धमकी दिल्यामुळे दिव्याची घरातून हकालपट्टी करण्यात आली. नियमांच्या चौकटीत राहून बिग बॉसने सुरक्षेचं कारण देत तिला बाहेरचा रस्ता दाखवला. पण आता घराबाहेर पडताच दिव्याने जो पवित्रा घेतलाय, तो पाहता असं वाटतंय की हा वाद शांत होण्याऐवजी आता अधिकच पेटणार आहे.
एका टास्कदरम्यान तन्वी कोलतेने दिव्याला नॉमिनेट केलं आणि तिथेच ठिणगी पडली. रागाच्या भरात दिव्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि ती गरजली, "बाहेर मी सरकार म्हणून वावरते! माझ्या हातात कायम तलवार असते. ती आता घरी आहे याचा अर्थ असा नाही की मी इथलं विसरेन. बाहेर गेल्यावर मी ती तलवार नक्कीच चालवेन." हिंसेला खतपाणी घालणारं हे वक्तव्य बिग बॉसने गंभीरपणे घेतलं. दिव्याला तिची चूक सुधारण्याची आणि माफी मागण्याची संधी दिली गेली, पण स्वाभिमानी दिव्याने कोणासमोरही झुकण्यास नकार दिला. माफी मागण्यापेक्षा तिने ताठ मानेने घराबाहेर जाणं पसंत केलं आणि तिथूनच या नवीन संघर्षाची सुरुवात झाली.
advertisement
"लवकरच येतेय..." दिव्याचा सोशल मीडियावरून इशारा
घरातून बाहेर आल्यावर दिव्या शांत बसेल असं वाटलं होतं, पण तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, "नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय! केवळ महाराष्ट्रच नाही, तर जगभरातून तुम्ही मला जे प्रेम आणि पाठिंबा दिलात, त्याबद्दल मी तुमची कायम ऋणी राहील. आता विषय संपलेला नाही, तर तो आता कुठे सुरू झालाय!"
advertisement
advertisement
दिव्याच्या या 'विषय सुरू झालाय' या एका वाक्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. ती आता बिग बॉसच्या मेकर्सवर काही आरोप करणार की तिला टार्गेट करणाऱ्या सदस्यांचा पोलखोल करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. इतकंच नाही, तर दिव्याच्या चाहत्यांना ती घरात परत दिसणार आहे का अशी शंका वाटू लागली आहे. काहींनी असंही म्हटलं आहे की, कदाचित दिव्याला सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात येऊ शकतं. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच, हा व्हिडीओ बिग बॉसच्या घराबाहेरील असल्यांमुळे, ती सीक्रेट रूममध्ये असण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
दिव्या घराबाहेरून करणार स्पर्धकांची पोलखोल?
दिव्याने आपल्या व्हिडिओमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही, पण तिचा रोख नक्की कोणाकडे आहे हे लपून राहिलेलं नाही. काहींच्या मते दिव्याकडे घरातील काही अशा गोष्टींचे पुरावे आहेत जे समोर आल्यास मोठी खळबळ उडू शकते. तिने स्वतःला 'सरकार' म्हटल्यामुळे तिच्या मागे असलेली जनशक्ती आणि तिचा आक्रमक स्वभाव पाहून निर्मात्यांचीही धाकधूक वाढली असण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 3:58 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'आता विषय सुरू झालाय', घराबाहेर काढल्यानंतर दिव्या शिंदे सीक्रेट रूममध्ये? नव्या VIDEO मध्ये 'सरकार'चा इशारा










