Jalana: सर हे काही बरोबर नाही! बारावीच्या परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार, 6 शिक्षक निलंबित
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्याच्या सक्त सूचना जालनाच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या होत्या.
जालना : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्याच्या सक्त सूचना जालनाच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या होत्या. तसेच, गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांवर देखील कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता.
परंतु, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला अनेक खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळांनी हरताळ फासला. यामुळे पहिल्याच इंग्रजी विषयाच्या पेपरला अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार पाहायला मिळाले. भरारी पथकाने केंद्रांना भेटी देऊन तपासणी केली असता काही विद्यार्थी कॉपी करताना आढळले. त्यांना तत्काळ रस्टिकेट करण्यात आले असून कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न पकडणाऱ्या, एका अर्थाने कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या तब्बल सहा शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत.
advertisement
त्यानुसार जालन्यातील तब्बल सहा शिक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. भालेराव आर. के., पी. बी. वाघ, शिक्षिका पी. ए. सोळंके, एन. एम. जायभाये, बी. ई. राव आणि एस. आर. जाधव यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी बाळू खरात यांनी दिले आहेत.
advertisement
दरम्यान, शिक्षकांवर थेट निलंबनाची कारवाई झाल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. दहावी बारावी परीक्षा कॉपीमुक्त घेण्याच्या सक्त सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. या सूचनांचे काटेकोर पालन न झाल्याने ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 7:10 PM IST
मराठी बातम्या/जालना/
Jalana: सर हे काही बरोबर नाही! बारावीच्या परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार, 6 शिक्षक निलंबित







