advertisement

'साहेबांची बरोबरी सोप्पी नाय', भाजपच्या माजी आमदारावर उधळल्या नोटा, खांद्यावर घेऊन नाचले, VIDEO व्हायरल

Last Updated:

आता समर्थकांनी नोटा उधळल्या हे पाहून माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही ठेका धरला. त्यानंतर समर्थकांनी नरेंद्र पवार यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि

News18
News18
कल्याण : अलीकडे ग्रामपंचायत, झेडपी आणि महापालिका निवडणुका पार पडल्या आहे. कार्यकर्त्यांसाठी समजल्याा जाणाऱ्या निवडणुकीत नेत्यांनी जंगी सभा घेतल्या आणि जोरदार कामही केलं. आता, आपला नेता आपल्यासाठी एवढं काही करत असल्याचं म्हटल्यावर  साहेबांचं कौतुक तर झालंच पाहिजे. अशातच कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर एका कार्यक्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, आमदार साहेबांना हे इतकं आवडलं की, त्यांनी हा व्हिडीओ व्हॉट्सअप स्टेट्सला ठेवलं आहे.
कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार नरेंद्र पवार हे  एका लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमाला हजर झाले होते. यावेळी त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र पवार यांच्या नोटा उधळल्या. यावेळी एका गायकाने साहेबांसाठी खास गाणं गायलं, त्यानंतर समर्थकांनी आमदार साहेबांवर नोटांचा पाऊस पाडला.
advertisement
आता समर्थकांनी नोटा उधळल्या हे पाहून माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही ठेका धरला. त्यानंतर समर्थकांनी नरेंद्र पवार यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि सगळ्यांनी जोरदार डान्स केला. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ पवार यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
'साहेबांची बरोबरी सोप्पी नाय', भाजपच्या माजी आमदारावर उधळल्या नोटा, खांद्यावर घेऊन नाचले, VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement