नऊवारी साडी अन् डॅशिंग अवतार, निर्मिती सावंत पुन्हा सासूच्या भुमिकेत; मराठी TV च्या हँडसम हंकचाही कडक रोल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'अगं अगं सुनबाई काय म्हणता काय सासूबाई' या सिनेमानंतर अभिनेत्री निर्मिती सावंत पुन्हा एकदा सासूच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सासू सासू साधी सुधी नसून चांगलीच डॅशिंग आहे.
मराठी टेलिव्हिजनची गंगुबाई म्हणजेच अभिनेत्री निर्मिती सावंत. गेली अनेक वर्ष मालिका, नाटक आणि सिनेमाच्या माध्यमातून निर्मिती सावंत यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांचा क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम या सिनेमातही निर्मिती सावंत यांनी एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे 'अगं अगं सुनबाई काय म्हणता काय सासूबाई' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. सिनेमात त्यांनी साकारलेली सासू ही इतर सासूंपेक्षा वेगळी ठरली आहे.
या सिनेमानंतर अभिनेत्री निर्मिती सावंत पुन्हा एकदा सासूच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सासू सासू साधी सुधी नसून चांगलीच डॅशिंग आहे. निर्मिती सावंत यांच्या नव्या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात मराठी टेलिव्हिजनवरील तगडी स्टारकास्ट आहे. तसंच टेलिव्हिजनचा हँडसम हंक अभिनेता देखील कडक रोलमध्ये दिसतोय.
advertisement
आपल्याकडे कौटुंबिक गोष्टी आवडीने बघणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. कुटुंबातील सुख दुःखाच्या गोष्टीत रमणारा, कथेतील पात्रांसोबत हसणारा- रडणारा. कौटुंबिक कथेला प्रेक्षक नेहमीच दाद देतात. अशा सर्वच स्तरांतील, वयोगटातील आणि विविध भागांतील प्रेक्षकांना आवडेल रुचेल आणि मनापासून भावेल अशीच गोष्ट निर्मिती सावंत घेऊन आल्या आहेत. 'सुपर डुपर' असं या सिनेमाचं नाव आहे. सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झाला आहे.
advertisement
या टिझरमधून चित्रपटातील एकाहून एक सरस कलाकारांची झलक बघायला मिळाली आहे. निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते आणि मुख्य नायक नायिकेच्या भूमिकेत असलेले ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले अशी भलीमोठी स्टारकास्ट सिनेमात दिसणार आहे. टीझरमध्ये अभिनेत्री निर्मिती सावंत डॅशिंग रोलमध्ये दिसत आहेत. त्यांनी नऊवारी साडी नेसली आहे. नाकात नथ आणि डोळ्यांना काळा चश्मा लावला आहे. हातात फायरिंग गन दिसत आहे. शेवटी टेलिव्हिजनचा हँडसम हंक अभिनेता ललित प्रभाकर देखील कडक लुकमध्ये एन्ट्री घेताना दिसतोय. कौटुंबिक महासोहळा अशी टॅगलाईन घेऊन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. येत्या 3 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
advertisement
माणसाच्या जडणघडणीमध्ये नेहमीच एका कुटुंबाचा हात असतो. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आपलासा वाटेल असा हा सिनेमा आहे, असं सिनेमाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी म्हटलं आहे. 'अगं अगं सुनबाई ! काय म्हणताय सासूबाई?' या सिनेमातून एका कुटुंबातील सुखदुःखाची गोष्ट सांगितली. आता सुपर डुपर सिनेमातून एका कुटुंबाचीच पण अतिशय वेगळ्या धाटणीची आणि धमाकेदार गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 4:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
नऊवारी साडी अन् डॅशिंग अवतार, निर्मिती सावंत पुन्हा सासूच्या भुमिकेत; मराठी TV च्या हँडसम हंकचाही कडक रोल






