advertisement

Rajpal Yadav च्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा? कोणी दिली मदत, कोणी फक्त आश्वासन, पाहा संपूर्ण यादी

Last Updated:

Rajpal Yadav Cheque Bounce Case : बॉलिवूडचा लाडका ‘छोटा पंडित’ म्हणजेच राजपाल यादव सध्या अशाच एका गंभीर संकटातून जात आहेत. पडद्यावर कायम विनोदी भूमिका करणारा हा अभिनेता आता कायदेशीर अडचणीत अडकला आहे.

राजपाल यादव - फोटो सोर्स : सोशल मीडिया
राजपाल यादव - फोटो सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : दैनंदिन आयुष्यात आपण सगळेच ताणतणावातून काही क्षण मोकळे होण्यासाठी हसण्याचा आधार घेतो. एखादा कॉमेडी सीन लागला की आपण सगळं विसरून पोट धरून हसतो. पण कल्पना करा… ज्याने आयुष्यभर लोकांना हसवलं, तोच कलाकार आज स्वतः कठीण प्रसंगात सापडला आहे. बॉलिवूडचा लाडका ‘छोटा पंडित’ म्हणजेच राजपाल यादव सध्या अशाच एका गंभीर संकटातून जात आहेत. पडद्यावर कायम विनोदी भूमिका करणारा हा अभिनेता आता कायदेशीर अडचणीत अडकला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
5 कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादव यांना 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी आत्मसमर्पण केले आणि सध्या ते दिल्लीतील तिहार कारागृहात आहेत. खरंतर ही अडचण आजची नाही. 2010 साली ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी घेतलेलं कर्ज व्याजासह वाढत जाऊन आता 9 कोटी रुपयांच्या वर पोहोचलं आहे. एकेकाळी सेटवर गजबजलेला आणि ऊर्जाने भरलेला कलाकार आज शांतपणे या संकटाचा सामना करत आहे.
advertisement
या घटनेनंतर आता सोशल मीडियावर सहानुभूतीचे पोस्ट्स आणि समर्थनाचा ओघ दिसतोय. अनेक मोठ्या कलाकारांनी मदतीची तयारी दाखवली आहे. तसेच इतरांना देखील मदत करण्यासाठी पुढे यायला सांगितलं आहे. आता पर्यंत कोणी कोँी राजपाल यादव यांना मदत केली आणि आता त्यांच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आहे? हा खरा प्रश्न आहे.
माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 1 कोटी 57 लाख रुपये जमाenter
सोनू सूद यांनी त्यांना आपल्या आगामी चित्रपटासाठी साईन करत काही रक्कम आगाऊ देण्याची तयारी दाखवली आहे. सलमान खान आणि अजय देवगण यांनीही मॅनेजरशी संपर्क साधून कायदेशीर मार्गाने मदत करण्याची चर्चा केली आहे. काही इतर व्यक्तींनीही आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मात्र, जाहीर झालेली आणि प्रत्यक्ष खात्यात आलेली रक्कम यात अजूनही तफावत आहे. 9 कोटींच्या तुलनेत जमा रक्कम खूपच कमी आहे.
advertisement
नावंओळखमदत
राव इंद्रजीत सिंहम्यूजिक प्रोड्यूसर (Gem Tunes)₹1,11,00,000 (1.11 कोटी)
मीका सिंहप्रसिद्ध गायक₹11,00,000 (11 लाख)
तेज प्रताप यादवजनशक्ति जनता दल चीफ (बिहार)₹11,00,000 (11 लाख)
नवाजुद्दीन सिद्दीकीबॉलीवुड अभिनेता₹10,00,000 (10 लाख)
केआरके (KRK)फिल्म क्रिटिक/एक्टर₹10,00,000 (10 लाख)
अनूप जलोटाभजन सम्राट₹5,00,000 (5 लाख)
सोनू सूदअभिनेतासिनेमामध्ये रोल आणि साइनिंग अमाउंट (रक्कम गुप्त)
गुरु रंधावा गायकअभिनेताअपकमिंग प्रोजेक्टसाठी एडवांस पेमेंट (रक्कम गुप्त)
advertisement
सलमान खानअभिनेता आणि सुपरस्टारगुप्त सहयोग
अजय देवगनअभिनेतागुप्त सहयोग
डेविड धवननिर्देशकमदतीचं आश्वासन
सुटका कधी होणार?
राजपाल यादव यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असली तरी न्यायालयाने स्पष्ट केले आहे की आधी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. जर उर्वरित रक्कम भरली गेली किंवा न्यायालयाकडून दिलासा मिळाला, तरच त्यांची सुटका शक्य आहे.
advertisement
राजपाल यांच्या मॅनेजरने यावर सांगितलं की, सोशल मीडियावरील सहवेदना पुरेशी नाही. ही लढाई आता आर्थिक तोडग्यावर येऊन थांबली आहे. अनेक जण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत आहेत, पण अंतिम निर्णय न्यायालय आणि आर्थिक व्यवहारांवरच अवलंबून आहे. ज्याने लाखो लोकांना हसवलं, त्या कलाकाराला आज अशा परिस्थितीत पाहणं चाहत्यांसाठी वेदनादायक आहे.
त्यामुळे आता ‘छोटा पंडित’ पुन्हा एकदा पडद्यावर हसताना दिसणार का? हे तर आता काळच सांगेल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rajpal Yadav च्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा? कोणी दिली मदत, कोणी फक्त आश्वासन, पाहा संपूर्ण यादी
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement