Ram Mandir : 'राम आएंगे' ऐका लता मंगेशकर यांच्या आवाजात, AI वर तयार झालेल गाणं सोशल मीडियावर व्हायरल
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
जगाचा निरोप घेतलेल्या अनेक कलाकारांच्या आवाजातील गाणी पुन्हा तयार करण्यासाठी लोकांनी AI चा वापर करणं सुरु केलं आहे.
सध्याच सोशल मीडिया एआय आणि एडिटेड व्हिडीओने भरलेलं आहे. एआय आणि इतर व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेअर वापरणं सोपं झालं असल्याने अनेकजण याचा सर्रास वापर करताना दिसतात. तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल की बरेचजण एआयचा वापर करून पंतप्रधान मोदींच्या आवाजात गाणी आणि व्हिडीओ तयार करतात. याशिवाय आता जगाचा निरोप घेतलेल्या अनेक कलाकारांच्या आवाजातील गाणी पुन्हा तयार करण्यासाठी लोकांनी AI चा वापर करणं सुरु केलं आहे.
भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. परंतु लता दीदींना आजही त्यांच्या सदाबहार गाण्यासाठी ओळखलं जात. सध्या सोशल मीडियावर लता दीदींच्या आवाजातील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लता मंगेशकर यांच्या आवाजात "राम आयेंगे" या गाण्याचे एआयच्या माध्यमातून रीक्रिएशन करण्यात आले आहे.
advertisement
एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असून हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की त्यांना हे गाणं ऐकून अश्रू अनावर झाले. तर काहींनी म्हंटले लतादीदींच्या आवाजात हे गाणं ऐकल्याने मनाला शांती मिळाली. तर काही लोकांनी म्हंटले की, 'चांगली कल्पना आहे, पण तरीही हा आवाज त्यांच्या जवळही जात नाही.'
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2024 10:13 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ram Mandir : 'राम आएंगे' ऐका लता मंगेशकर यांच्या आवाजात, AI वर तयार झालेल गाणं सोशल मीडियावर व्हायरल








