Saif Ali Khan : सैफच्या घरात घडणार पुन्हा हल्ल्याचा थरार, शहजाद करीना समोरासमोर येणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
खरं तर 15 जानेवारीच्या रात्री हल्लखोर मोहम्मद शहजाद ऊर्फ विजय दास हा इमारतीत सुरक्षेच्या कारणास्तव लावलेले सीसीटीव्ही चुकवत थेट बिल्डींगमध्ये शिरला होता. यावेळी त्याने सैफच्या 12 व्या मजल्यावरील घरात दाखल होण्यासाठी इमर्जन्सी शिड्यांचा वापर केला होता.
Saif Ali Khan Case update : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 15 जानेवारीच्या मध्यरात्री आणि 16 जानेवारीच्या पहाटे 2 वाजता भीषण हल्ल्याची घटना घडली होती. हल्ल्यापुर्वी गाढ झोपेत असलेल्या सैफला स्वप्नातही वाटलं नसेल की अशाप्रकारे त्याचे झोप उडेल आणि भीषण हल्ला होईल. मात्र प्रत्यक्षात 15 जानेवारीला तसं घडलं आहे. या घटनेत सुदैवाने करीना कपूर, तैमूर आणि जेहद बचावले आहेत. मात्र हा हल्ला त्यांच्यात एक भीती निर्माण करून गेला आहे. पण आता याच हल्ल्याच्या थराराला करीना कपूरला पुन्हा सामोरे जावे लागणार आहे. यमागचं कारण काय आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर 15 जानेवारीच्या रात्री हल्लखोर मोहम्मद शहजाद ऊर्फ विजय दास हा इमारतीत सुरक्षेच्या कारणास्तव लावलेले सीसीटीव्ही चुकवत थेट बिल्डींगमध्ये शिरला होता. यावेळी त्याने सैफच्या 12 व्या मजल्यावरील घरात दाखल होण्यासाठी इमर्जन्सी शिड्यांचा वापर केला होता. त्यानंतर जेहदच्या रूममधून तो आत घरात शिरला होता. यावेळेस जेहेदच्या नॅनीने त्याला पाहिले असता, आरोपीने 1 कोटीची खंडणी मागितली.या खंडणीनंतर नॅनी आणि हल्लेखोरामध्ये वाद झाला.
advertisement
या वादानंतर सैफला जाग आली आणि हा हल्ल्याचा थरार घडला. या हल्ल्यात मोहम्मद शहजादने सैफवर 6 गंभीर हल्ले केले. यातील 2 हल्ले खुपच गंभीर स्वरूपाचे होते. त्यामुळे सैफ प्रचंड रक्तबंबाळ झाला होता. या हल्ल्यानंतर आरोपीने पळ काढला होता. आणि करीनाने इब्राहिमच्या मदतीने सैफला लीलावती रूग्णालयात दाखल केले होते.सध्या सैफची प्रकृची ठीक आहे आणि लवकरच त्याला डिस्चार्ज दिली जाण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान पोलिसांनी रविवारी या आरोपीला अटक केल्यानंतर त्याची चौकशी सूरू केली आहे.या चौकशीचा एक भाग म्हणून मोहम्मद शहजादला पुन्हा एकदा सैफच्या घरात नेले जाणार आहे. हल्लेखोर आरोपी सैफच्या घरात कसा शिरला. त्यानंतर सैफवर त्याने कसा हल्ला केला. हल्ला केल्यानंतर तो कोणत्या मार्गाने पळाला. या सगळ्या गोष्टी रिक्रिएट केल्या जाणार आहेत. त्यात सैफ अजूनही रूग्णालयात असल्याने आरोपी हल्लेखोर पुन्हा करीना समोर येण्याची शक्यता आहे.त्यामुळे करीनाच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा डोळ्यासमोर येणार आहे.
advertisement
ही घटना रिक्रिएट करताना पोलिसांच्या हाती नेमके आणखी कोणते पुरावे लागतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2025 1:48 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Saif Ali Khan : सैफच्या घरात घडणार पुन्हा हल्ल्याचा थरार, शहजाद करीना समोरासमोर येणार







