Kriti Sanon: लंडनच्या रस्त्यावर मिस्ट्री मॅनसोबत क्रिती सेनॉन, हात पकडून फिरतेय अभिनेत्री; Video Viral
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. लंडनच्या रस्त्यावर बिझनेसमन बॉयफ्रेंडसोबत अभिनेत्री फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिच्या आणि बिझनेसमन कबीर बहियाच्या डेटिंगच्या चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे. क्रिती तब्बल 9 वर्षे लहान असलेल्या बिझनेसमनला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या सर्व चर्चांदरम्यान, क्रिती आणि कबीर लंडनच्या रस्त्यावर एकत्र फिरत असल्याचे दिसत आहे. सध्या त्यांचा एकत्र फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये या स्वीट कपलची जोरदार चर्चा होत आहे. हे दोघंही लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी क्रिती सेनॉनची बहिण नुपूर हिचं लग्न होतं. तिच्या लग्नासाठी कबीर सुद्धा आल्याचं पाहायला मिळाला. तेव्हा लग्नाच्या वेळी क्रिती आणि कबीर अनेक फोटोंमध्ये एकत्रच स्पॉट झाले होते. आता क्रितीच्या बहिणीच्या लग्नानंतर क्रिती आणि कबीर पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. क्रिती आणि कबीरने त्यांचं नातं अजूनही जगजाहीर केलेलं नाही. पण त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, क्रिती आणि कबीर लंडनच्या रस्त्यावर एकत्र हात हातात घेऊन एकत्र फिरताना दिसत आहे. आयेशा नूर नावाच्या एका फॅन्सने हा व्हिडिओ शूट केलेला आहे.
advertisement
i ran into kriti sanon too. i didn't ask for a photo 😭 pic.twitter.com/h9wm6gO2xi
— Shuja (@ShujaaAzmi) February 21, 2026
व्हायरल व्हिडिओमध्ये, क्रितीने ब्राऊन कलरचा टॉप, डेनिम जीन्स आणि जॅकेट कॅरी केलेलं आहे. तर कबीरने व्हाईट टीशर्ट, डार्क ब्लू जॅकेट आणि ट्रॅक पँट कॅरी केलेली दिसत आहे. विशेष म्हणजे, क्रिती आणि कबीर हे दोघंही एकत्र फिरताना त्यांनी हात हातात घेऊन फिरताना दिसले. दोघांचाही हा सिंपल अंदाज चाहत्यांच्या पसंदीस पडला आहे. सध्या त्यांच्या फॅशन लूक्सचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक केले जात आहे. व्हायरल व्हिडिओवर अनेक चाहत्यांकडून या कपलवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, क्रिती आणि कबीर या दोघांमध्ये तब्बल 9 वर्षांचं अंतर आहे. क्रिती 35 वर्षांची आहे तर कबीर 26 वर्षांचा आहे.
advertisement
दरम्यान, क्रिती सेनॉनच्या कामाबद्दल बोलायचं तर, क्रिती शेवटची धनुषसोबत 'तेरे इश्म में' चित्रपटामध्ये एकत्र दिसली होती. आता त्यानंतर ती लवकरच 'कॉकटेल 2' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी चित्रपटामध्ये क्रितीसोबत शाहिद कपूर आणि रश्मिका मंदान्ना सुद्धा दिसणार आहे. क्रितीच्या या आगामी चित्रपटासाठी सध्या बराच वेळ आहे. कबीर बहियाविषयी बोलायचं तर, कबीर एक ब्रिटीश व्यापारी असून तो वर्ल्डवाइड एव्हिएशन अँड टुरिझम लिमिटेडचा संस्थापक सुद्धा आहे. यूके स्थित ट्रॅव्हल एजन्सी साउथॉल ट्रॅव्हलचे मालक कुलजिंदर बहिया यांचा तो मुलगा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 3:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Kriti Sanon: लंडनच्या रस्त्यावर मिस्ट्री मॅनसोबत क्रिती सेनॉन, हात पकडून फिरतेय अभिनेत्री; Video Viral









