झी मराठीची 'ही' लोकप्रिय मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; नाव ऐकून तुम्ही व्हाल निराश
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
झी मराठीची एक लोकप्रिय मालिका संपणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मालिकेतील अभिनेत्रीनं स्वतः पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. या मालिकेचं नाव ऐकून प्रेक्षकांची निराशा हे नक्की.
मुंबई :टीआरपीच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी वाहिन्या नवनवीन प्रयोग करताना दिसतात. झी मराठी वाहिनीवरही जुन्या मालिका बंद होत नव्या मालिकांचे प्रोमो रिलीज झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर तीन नव्या मालिकांचे प्रोमो रिलीज झाले. त्यानंतर जुन्या कोणत्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. आता झी मराठीची एक लोकप्रिय मालिका संपणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मालिकेतील अभिनेत्रीनं स्वतः पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. या मालिकेचं नाव ऐकून प्रेक्षकांची निराशा हे नक्की.
झी मराठीवर लागोपाठ नवीन मालिका दाखल होत आहेत. जुन्या मालिकांना काही केल्या टीआरपी मिळत नाहीये. टीआरपीच्या शर्यतीती झी मराठीच्या मालिका खूप मागे आहेत. त्यामुळे जुन्या मालिका संपवून नवीन मालिका सुरु करण्याचा ट्रेंड सध्या झी मराठीवर दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पारू आणि शिवा या दोन मालिकांचे प्रोमो समोर आले होते. त्यानंतर 'जगद्धात्री' या घोषणा झाली होती. त्यामुळे आता झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय मालिका संपणार असल्याची शक्यता आहे.
advertisement
प्रेमात पडली पण बॉयफ्रेंडनं दाखवले असे गुण; प्राजक्ता माळीनं पहिल्यांदाच केला ब्रेकअपविषयी खुलासा
झी मराठीची 'तू चाल पुढं' ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मालिकेतील अभिनेत्री धनश्री काडगावकरने एक पोस्ट शेअर केली आहे त्यावरूनच ही मालिका संपणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे. ‘तू चालं पुढं’ या मालिकेत धनश्री शिल्पी हे पात्र साकारत आहे. सेटवरचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने त्याला “शूटिंगचे शेवटचे काही दिवस” असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे धनश्रीची इन्स्टा स्टोरी पाहून ‘तू चालं पुढं’ मालिका बंद होणार असल्याचं बोललं जातंय.
advertisement
‘तू चालं पुढं’ या मालिकेतुन अंकुश चौधरीची पत्नी आणि अभिनेत्री दीपा परब चौधरीने अभिनयविश्वात जोरदार कमबॅक केलं. तिची 'अश्विनी वाघमारे' ही भूमिका घराघरात लोकप्रिय झाली. ‘तू चाल पुढं’ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. मालिकेचं कथानक अश्विनी भोवती फिरताना दिसलं. तर धनश्री काडगावकरने शिल्पी हे खलनायिकेचं पात्र साकारलं आहे. या मालिकेत अश्विनी सारख्या एका सामान्य गृहिणीची कथा दाखवण्यात आली आहे. त्यामुळे मालिका महिला वर्गाने चांगलीच उचलून धरलेली पाहायला मिळाली. नवऱ्याचा विरोध पत्करून, सासूची मनधरणी करून अश्विनी हळूहळू स्वतःचे अस्तित्व सिद्ध करताना दिसली. बऱ्याचदा तिला वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागले. घर खर्चाला हातभार लागावा म्हणून अश्विनी पार्लरचा व्यवसाय सुरू करते. या कथानकामुळं अश्विनी प्रत्येक गृहिणीला आपल्यासारखीच भासली. पण आता हि मालिका निरोप घेणार असल्याने प्रेक्षकांची निराशा होणार हे नक्की.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 05, 2024 4:43 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
झी मराठीची 'ही' लोकप्रिय मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; नाव ऐकून तुम्ही व्हाल निराश


