advertisement

बदलापूर पुन्हा हादरले! ट्युशनला जाताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तिनेच सांगितला सर्व प्रकार

Last Updated:

Shocking News: बदलापूरमध्ये पुन्हा एकदा चिमुकली सोबत भयंकर प्रकार घडलेला आहे. जिथे रिक्षा चालकाला अटक करण्यात आलेली आहे.

Ambernath rickshaw driver arrested under POCSO in Badlapur
Ambernath rickshaw driver arrested under POCSO in Badlapur
बदलापूर : बदलापूर शहर पुन्हा एकदा संतापजनक घडलेल्या प्रकाराने हादरला आहे. एका 10 वर्षांच्या चिमुरडीचा भररस्त्यात विनयभंग केल्याची घटना बदलापूर पूर्व भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अंबरनाथ येथील एका रिक्षाचालकाला अटक केली असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ट्युशनला जाताना घडला भयंकर प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 6 फेब्रुवारी रोजी घडली. पीडित मुलगी नेहमीप्रमाणे ट्युशनला जात होती. त्याचवेळी आरोपी रिक्षाचालकाने तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन हा प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा मागोवा 
पोलिसांनी तातडीने परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये आरोपीची रिक्षा आणि त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अंबरनाथमधून त्याला बेड्या ठोकल्या.
advertisement
आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. बदलापूरमध्ये यापूर्वीही शाळेतील मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने येथील नागरिकांमध्ये आधीच संतापाचे वातावरण आहे. त्यातच ट्युशनला जाणाऱ्या सुरक्षित मुलीवर अशा प्रकारे अत्याचार झाल्याने पालकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
बदलापूर पुन्हा हादरले! ट्युशनला जाताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तिनेच सांगितला सर्व प्रकार
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement