advertisement

मुख्यमंत्र्यांसमोर मुंबई पालिकेत राडा, ५० खोकेची घोषणा, गदारोळातच महापौर-उपमहापौरांची निवड

Last Updated:

BMC Mayor And Deputy Mayor Election: मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली.

मुंबई महापालिका- महापौर-उपमहापौरपद निवडणूक
मुंबई महापालिका- महापौर-उपमहापौरपद निवडणूक
मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक संपन्न झाली. तब्बल ४० वर्षांनंतर रितू तावडे यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबई नगरीत बसणार आहे. उपमहापौर म्हणून शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड करण्यात आली. निवडणुकीची सगळी प्रक्रिया प्रचंड गदारोळातच पार पडली. मुंबई पालिकेतील महायुतीच्या सत्तारोहणाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुती सरकारमधील मंत्री उपस्थित होते. त्यांच्यासमोर सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी एकमेकांविरोधात प्रचंड घोषणा दिल्या.
मुंबईकरांनी महायुतीला भरभरून साथ दिल्यानंतर महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक बुधवारी सकाळी ११ वाजता संपन्न झाली. महापौरपदासाठी रितू तावडे तर उपमहपौरपदासाठी संजय घाडी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषित करण्यात आली. महायुतीच्या सदस्यांनी यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला तसेच महायुतीच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. परंतु निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असताना दोन्ही बाजूकडील सदस्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
advertisement

शिवसेनेच्या गटनेत्या पेडणेकरांनी पीठासीन अधिकाऱ्यांवर आक्षेप नोंदवला

निवडणुकीची प्रक्रिया सुरू करताच शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पीठासीन अधिकाऱ्यांवर आक्षेप नोंदवला. महापालिकेत तब्बल सातवेळा निवडून आलेल्या श्रद्धा जाधव यांच्यावर जबाबदारी देण्याऐवजी प्रशासनाने परंपरा मोडीत काढण्याला पसंती दिल्याचे म्हणत शासनावर आरोप केले. यावेळी ठाकरे सेनेच्या नगरेसेवकांनी निषेध निषेध म्हणत पेडणेकरांना साथ दिली. त्यावर सरकारी नियम सांगत तुमचा आक्षेप चुकीचा असल्याचे आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.
advertisement

घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले

जय श्रीराम, देवाभाऊ आगे बढो, महायुतीचा विजय असो... अशा घोषणा सेना-भाजपचे नगरसेवक देत होते. तर उद्धव ठाकरेंचा विजय असो, शिवसेनेचा विजय असो... अशा घोषणा सेनेचे नगरसेवक देत होते. दोन्ही बाजूकडील सदस्यांच्या घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले होते.

महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर फडणवीस काय म्हणाले?

मुंबई मनपात यापूर्वी एकदा आलो होतो. मुंबई महापालिकेचे कामकाज प्रत्यक्ष उपस्थित राहून मी पहिल्यांदा पाहिले. मुंबई क्विन गॅलरीत पहिल्यांदा बसलो. मुंबईत महायुतीची सत्ता आली याचा विशेष आनंद आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातली मुंबई करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. लोकांना लोकशाहीचे राज्य अपेक्षित आहे, असे महापौर-उपमहापौर निवडणुकीनंतर फडणवीस काय म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुख्यमंत्र्यांसमोर मुंबई पालिकेत राडा, ५० खोकेची घोषणा, गदारोळातच महापौर-उपमहापौरांची निवड
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement