Christmas 2025: ख्रिसमससाठी इतकं स्वस्त कुठेच नाही! कल्याणमध्ये करा 30 रुपयांपासून खरेदी
- Reported by:
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
अवघ्या दोन दिवसांवर ख्रिसमस सण येऊन ठेपल्याने कल्याण मार्केट पूर्ण लाल रंगाने गजबजलेले दिसत आहे. यामध्ये ख्रिसमससाठी लागणाऱ्या सामानांचे दुकान आणि कपड्यांचे दुकान सजले आहे.
लहान मुलांच्या आवडत्या सणांपैकी नाताळ हा एक सण आहे. कारण, या दिवशी त्यांना भरपूर सारे चॉकलेट्स आणि गिफ्ट्स मिळतात. ख्रिसमसनिमित्त शाळांमध्ये देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे, जगभरातील अनेक देशांमध्ये ख्रिसमसची नुसती धामधूम पहायला मिळते. यावर्षी सुद्धा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांमध्ये सणाची लगबग पाहायला मिळत आहे. आता अशातच सर्वत्र सँटाक्लॉजच्या कपड्यांच्या खरेदी साठी बाजारामध्ये नागरिकांची झुंबड पाहायला मिळत आहे.
अवघ्या दोन दिवसांवर ख्रिसमस सण येऊन ठेपल्याने कल्याण मार्केट पूर्ण लाल रंगाने गजबजलेले दिसत आहे. यामध्ये ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, माळा तसेच लहान मुलांचे कपड्यांनी दुकाने सजले असताना कल्याण पश्चिमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात 'फॅशन हाउस प्लस' या शॉपमध्ये फक्त 30 रुपयांपासून ते 450 रुपयांपर्यंत अतिशय कमी दरात लहान मुले ख्रिसमस सेलिब्रेशन करू शकतील अशा रेंजमध्ये कपडे इथे बघायला मिळतात. यामध्ये कपड्यांचे अनेक प्रकार बघायला मिळतात.
advertisement
- सांता क्लॉज सूट (Santa Claus Suit): लाल रंगाचा वेलवेटचा सूट, पांढऱ्या फरने सजलेला, डोक्यावरची टोपी आणि बूट हे मुख्य भाग असतात.
- एल्फ (Elf) वेषभूषा: हिरव्या किंवा लाल रंगाचे कपडे, जोड्यांचे मोजे आणि एल्फची टोपी.
- स्नोमॅन (Snowman) पोशाख: पांढऱ्या रंगाचे कपडे, ज्यात स्कार्फ आणि टोपीचा समावेश असतो.
- रेनडियर (Reindeer) पोशाख: तपकिरी रंगाचे कपडे आणि डोक्यावर शिंगे (Antlers).
advertisement
ठिकाण: कल्याण पश्चिमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला फॅशन हाउस प्लस
वेळ: सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 5:07 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Christmas 2025: ख्रिसमससाठी इतकं स्वस्त कुठेच नाही! कल्याणमध्ये करा 30 रुपयांपासून खरेदी








