Beetroot Dhokla : नेता राघव चड्डा यांच्या घरी बनतो बीटरूट ढोकळा, अत्यंत हेल्दी आणि टेस्टी नाश्ता! पाहा रेसिपी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Beetroot Dhokla Recipe In Marathi : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती आणि आप नेते राघव चड्ढा यांच्या घरी हा बीटाचा ढोकळा बनतो. काही दिवसांपूवी राघव यांनी एका मुलाखतीत सांगितले की, हा ढोकळा त्यांची आई बनवते. राघवला हा ढोकळा खूप आवडतो.
मुंबई : नाश्त्यामध्ये ढोकळा सर्वांनीच खाल्ला असेल. पण तुम्ही कधी बीटरूटचा ढोकळा खाल्ला आहे का? याच्या नावावरूनच कळतं हा ढोकळा अत्यंत हेल्दी आहे. कारण त्यामध्ये बीटरूट आहे. तसेच हा ढोकळा इंस्टंटली बनवता येतो. म्हणजेच याला फर्मेंटेशनची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला या ढोकळ्याची खास रेसिपी सांगत आहोत.
बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती आणि आप नेते राघव चड्ढा यांच्या घरी हा बीटाचा ढोकळा बनतो. काही दिवसांपूवी राघव यांनी एका मुलाखतीत सांगितले की, हा ढोकळा त्यांची आई बनवते. राघवला हा ढोकळा खूप आवडतो. हा बीटाचा ढोकळा बनवायलाही खूप सोपा आहे. cookingwithguddan या अकाऊंटवरही ही रेसिपी दाखवली गेली आहे. चला पाहूया बीटरूट ढोकळ्याची खास रेसिपी.
advertisement
बीटरूट ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- बीटरुट
- 1 कप बेसन
- 3/4 कप पाणी
- मीठ
- साखर
- इनो
- लिंबाचा रस
- मोहरीचे तेल
- मोहरीचे
- हिरव्या मिरच्या
- कढीपत्ता
बीटरूटचा ढोकळा बनवण्याची कृती
- बीटाचा ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी बीटरुट चिरून त्यामध्ये वरील प्रमाणात पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करा.
advertisement
- एका भांड्यात बेसन घ्या आणि त्यात बीटरुट प्युरी घाला.
- हे व्यवस्थित एकजीव करून गया. त्यामध्ये कोणत्याही गुठळ्या राहता कलाम नये.
- नंतर या बॅटरमध्ये मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला.
- एकीकडे ढोकळा स्टँडमध्ये पाणी गरम करा.
- पाणी गरम झाल्यावर तयार बॅटरमध्ये इनो घाला आणि पुन्हा हलके मिक्स करा.
advertisement
- नंतर एका भांड्याला तेल लावा, त्यात बॅटर टाका आणि हे ढोकळा स्टॅनफमध्ये ठेऊन वाफवून घ्या.
- दुसरीकडे फोडणी तयार करा. त्यासाठी एका पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करा, नंतर मोहरी, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला.
- ढोकळा शिजल्यानंतर तो प्लेटमध्ये काढून घ्या आणि टाळा चौकोनी आकारात कापा.
- नंतर त्यावर तयार केलेली फोडणी टाका. या फोडणीने ढोकळ्याची चव आणखी वाढेल.
advertisement
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 10:02 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Beetroot Dhokla : नेता राघव चड्डा यांच्या घरी बनतो बीटरूट ढोकळा, अत्यंत हेल्दी आणि टेस्टी नाश्ता! पाहा रेसिपी









