Turmeric Milk - आरोग्यवर्धक हळदीचं दूध, तब्येतीसाठी आहे गुणकारी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
हळद म्हणजे भारतीय स्वयंपाकघरातील सर्वगुणसंपन्न घटक..हळदीमुळे पदार्थांची चव तर छान येतेच, पण हळद आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते.
मुंबई : हळद म्हणजे भारतीय स्वयंपाकघरातील सर्वगुणसंपन्न घटक....सर्दी, खोकल्यामुळे हैराण
असल्यावर घरोघरी हळदीचं दूध दिलं जातं. घशाला आराम मिळतोच आणि घशाचं दुखणं, खवखव बरी होते. हळदीमुळे पदार्थांची चव तर छान येतेच, पण हळद आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते.
तुम्हालाही या बदलत्या ऋतूत स्वतःला निरोगी ठेवायचं असेल आणि आजारांपासून दूर ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात हळदीचा समावेश करू शकता.
advertisement
तुम्ही तुमच्या आहारात हळदीचा वापर अनेक प्रकारे करू शकता. तुम्हाला सर्दी आणि
खोकल्याची समस्या असेल तर तुम्ही रात्री हळदीचं दूध प्या. रात्री हळदीचं दूध पिण्याचे
शरीराला अनेक फायदे आहेत.
1. सर्दी आणि खोकल्यासाठी उपयुक्त -
advertisement
घसा खवखवणं, सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी हळदीचं दूध
उपयुक्त आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी दूध प्या.
2. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त -
advertisement
हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. हळदीचं दूध प्यायल्यामुळे
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
3. हाडांसाठी उपयुक्त -
दुधामध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्व ड असतं, यामुळे हाडं मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.
हळदीच्या दुधाचं सेवन केल्यामुळे हाडं मजबूत होतात.
advertisement
4. पचनासाठी फायदेशीर -
हळदीचं दूध पचनसंस्थेला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते आणि अपचन, गॅस आणि
advertisement
पोट फुगणं यासारख्या समस्या टाळता येतात.
5. त्वचेसाठी गुणकारी -
हळदीचं दूध पिण्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते. यामुळे मुरुम, त्वचेचे विकार, आणि
त्वचेशी संबंधित इतर समस्या टाळता येतात.
6. झोपेसाठी उपयुक्त -
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने मानसिक शांती मिळते. ज्यामुळे निद्रानाशाची समस्या
advertisement
टाळता येते आणि चांगली झोप लागते.
7. डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त -
हळदीमध्ये डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात, यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून
टाकण्यास मदत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2024 7:26 PM IST