Superfoods to improve eyesight : अंधुक दृष्टी सुधारण्यासाठी करा आहारात बदल, या फळांचा होईल फायदा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
तुम्हाला काही गोष्टी अंधुक दिसत असतील तर, आजपासूनच दृष्टी सुधारण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला एखादी वस्तू पाहताना त्रास होत असेल तर दृष्टी सुधारण्यासाठी आवश्यक गोष्टींचा आहारात समावेश करा.
मुंबई : तुम्हाला काही गोष्टी अंधुक दिसत असतील तर, आजपासूनच दृष्टी सुधारण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला एखादी वस्तू पाहताना त्रास होत असेल तर दृष्टी सुधारण्यासाठी आवश्यक गोष्टींचा आहारात समावेश करा. या खाद्यपदार्थांमुळे तुमचे डोळे निरोगी राहू शकतील.डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे आणि त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पण, आपण डोळ्यांवर सर्वाधिक भार देतो. तासन्तास मोबाइल पाहणं, लॅपटॉप-कॉम्प्युटरसमोर बसणं, इतकंच नाही तर धूळ, माती आणि प्रदूषणामुळे डोळे खराब होऊ लागतात. लहान वयातच चष्मा लागण्याचं प्रमाण वाढतंय, त्यात दृष्टी अंधुक होण्याचं प्रमाणही तितकंच आहे. जास्त वेळ एखादी गोष्ट पाहिली तर डोकेदुखीचा त्रास होतो. जवळचं किंवा दूर पाहायला त्रास होतो. अशा परिस्थितीत डोळे निरोगी ठेवायचे असतील तर काही गोष्टींचा आहारात समावेश करणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितकारक आहे.
advertisement
गाजर -
गाजर हे व्हिटॅमिन ए चा उत्कृष्ट स्त्रोत आहे, बीटा-कॅरोटीन डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं.
डोळ्यांना संसर्ग होण्याचं प्रमाण यामुळे कमी होऊ शकतं.
हिरव्या पालेभाज्या -
advertisement
हिरव्या पालेभाज्यांमध्ये,ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे, मोतीबिंदू
आणि वार्धक्यामुळे होणारे डोळ्यांचे आजार होण्याचा धोका कमी होतो.
मासे -
सॅल्मन, ट्यूना आणि सार्डिनसारखे मासे, ज्यामध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिडचं प्रमाण भरपूर असतं.
advertisement
डोळ्याच्या आरोग्यासाठी हा घटक फायदेशीर आहे, आणि डोळे कोरडे होण्याचं प्रमाण यामुळे कमी होऊ
शकतं.
अंडी -
अंड्यांमध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन, व्हिटॅमिन ए आणि झिंक हे घटक असतात, ज्यामुळे डोळे
निरोगी राहतात आणि डोळ्यांच्या आजारांपासून बचाव करणं शक्य होतं. डोळ्यांच्या स्नायूंची हानी
ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे अंधुक दिसू लागतं. तर डोळ्यात योग्य प्रमाणात
advertisement
अश्रू निर्माण झाले नाहीत तर डोळे कोरडे होतात त्यामुळे डोळ्याचा ओलावा कमी होतो.
लिंबूवर्गीय फळं -
व्हिटॅमिन सी भरपूर असल्यानं लिंबूवर्गीय फळं डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असतात. संत्री, आवळा
आणि लिंबू हे व्हिटॅमिन सीचे चांगले स्रोत आहेत.त्यामुळे ही फळं आहारात कायम ठेवा. डोळ्यांची काळजी घ्या.
जास्त त्रास होत असेल डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाणं टाळू नका.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2024 6:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Superfoods to improve eyesight : अंधुक दृष्टी सुधारण्यासाठी करा आहारात बदल, या फळांचा होईल फायदा