Toothache : दातदुखीमुळे हैराण ? या पाच पद्धतींचा करा वापर, दातदुखी होईल कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दातदुखीमुळे हैराण व्हायला होतं. काही खाणं-पिणं तर कठीण होतंच पण सतत वेदनेमुळे कोणीही त्रासून जातं. पण घरातल्याच काही गोष्टींचा वापर केला तर तुम्हाला लगेच आराम मिळेल.
मुंबई : दातदुखीमुळे हैराण व्हायला होतं. काही खाणं-पिणं तर कठीण होतंच पण सतत वेदनेमुळे कोणीही त्रासून जातं.
पण घरातल्याच काही गोष्टींचा वापर केला तर तुमच्या वेदना कमी होतील. दातांची योग्य काळजी
न घेणं हे दातदुखीचं सर्वात मोठं कारण आहे. दात नीट स्वच्छ न करणं, दात पिवळे पडणं,
दात किडणं, हिरड्या सुजणं आणि दातांच्या वरच्या थराला इजा होणं यामुळेही दातांना त्रास होतो.
advertisement
अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही दातदुखीचा त्रास होत असेल आणि या समस्येपासून
लवकरात लवकर आराम मिळवायचा असेल, तर दातदुखीपासून सुटका करुन घेण्यासाठी काही
उपाय उपयोगी येऊ शकतील.
advertisement
लवंग तेल -
दातदुखी कमी करण्यासाठी लवंगाचे तेल दातांवर लावता येतं. दुखत असलेल्या दातावर
लवंगांचं तेल किंवा लवंग पावडर लावल्यास वेदना कमी होतात. लवंगांचं तेल किंवा पावडर
कापसावर लावून दातांमध्ये दाबून धरल्यानं वेदना कमी होतात.
advertisement
लसूण
अँटीमाइक्रोबियल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध लसूण
दातदुखीपासून आराम देऊ शकतो. लसणामध्ये एलिसिन देखील असते जे तोंडाचं
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. लसूण ठेचून दातांवर ठेवा किंवा लसणाचा रस दातांवर
चोळा. वेदना कमी होतील.
advertisement
गरम पाणी आणि मीठ
दात व्यवस्थित स्वच्छ केले तर वेदनाही कमी होऊ लागतात. यासाठी एक ग्लास गरम पाण्यात
एक चमचा मीठ घालून मिक्स करा. हे पाणी नीट मिक्स करून थोडंसं तोंडात टाकून गुळण्या करा.
advertisement
यामुळे दातांमध्ये साचलेली घाण दूर होईल तसंच कोमट पाणी आणि मीठही दातदुखी कमी
करण्यासाठी उपयुक्त आहे.
पेरूची पानं
पेरूच्या पानांचा वापर वेदना कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो, अगदी थोड्या काळासाठी का
होईना, तुम्ही पेरूची पानं बारीक करून दातांवर लावू शकता किंवा पेरूची पानं पाण्यात
advertisement
उकळून या पाण्याने गुळण्या करू शकता. तुमच्या वेदना कमी होतील.
बर्फानं शेक द्या
रुमालात बर्फ ठेवा आणि दुखऱ्या दाताच्या गालावर ठेवा. यामुळे दातदुखी कमी होऊ लागते.
10 ते 15 मिनिटं असं केल्यानं वेदना देखील कमी होऊ लागतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2024 2:29 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Toothache : दातदुखीमुळे हैराण ? या पाच पद्धतींचा करा वापर, दातदुखी होईल कमी