Cumin water : लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्या जिऱ्याचं पाणी, आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Last Updated:

लठ्ठपणा कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी पिणं हा उत्तम पर्याय आहे. केवळ लठ्ठपणासाठी नाही तर संपूर्ण आरोग्यासाठीही जिऱ्याचं पाणी फायदेशीर आहे.

जिरे पाणी : वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिऱ्याचे पाणी घेऊ शकता. यासाठी एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. ते उकळवून गाळून सकाळी रिकाम्या पोटी प्या.
जिरे पाणी : वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिऱ्याचे पाणी घेऊ शकता. यासाठी एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. ते उकळवून गाळून सकाळी रिकाम्या पोटी प्या.
मुंबई : लठ्ठपणा ही सर्वसामान्यपणे सगळ्यांनाच भेडसावणारी समस्या आहे. खराब आहार, तणाव आणि कमी शारीरिक हालचालींमुळे ही समस्या वाढत चालली आहे. यासाठी अनेक उपाय आहेत, आणि त्यातलाच एक म्हणजे, तुमच्या स्वयंपाकघरातला रोजच्या वापरातला एक साधा मसाला...जिरं...जिऱ्याचा योग्य वापर केला तर तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.
जिऱ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट, फायबर आणि इतर पोषक घटक असतात, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते आणि चयापचय क्रियेचा वेग वाढताे. केवळ पचनासाठी नाही तर शरीरातील चरबी कमी करण्यासाठी याची मदत होते. याच्या नियमित सेवनानं तुम्हाला तंदुरुस्त वाटेल.
जिरं पाणी -
एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. या उपायानं पोटाची चरबी तर कमी होतेच पण पचनशक्तीही सुधारते.
advertisement
जिरा पावडर -
जिरं हलकं परतून घ्या आणि बारीक करून पावडर करा. ही पावडर सकाळी कोमट पाण्यासोबत प्या. वजन कमी करण्याबरोबरच पचन सुधारण्यासाठीही हा चांगला पर्याय आहे.
जेवणात जिऱ्याचा वापर करा -
रोजच्या जेवणात जिऱ्याचा वापर करा. डाळी, भाज्यांमध्ये ते वापरल्यानं जेवणाची चव वाढेल आणि तुमच्या आरोग्यासाठीही हे फायदेशीर आहे.
advertisement
जिरे-लिंबू पाणी -
एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा जिरं पूड आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण सकाळी घ्या, यामुळे चयापचय वेगानं होईल आणि यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोग होईल.
या व्यतिरिक्त इतरही अनेक पर्याय वापरुन वजन कमी करु शकता.
नियमित व्यायाम करा. पुरेसं पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
advertisement
साखर आणि प्रक्रिया केलेलं अन्न टाळा, कारण त्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो. फायबर युक्त अन्न खा. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट भरलेलं राहतं. जिऱ्याचा योग्य वापर केला तर तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. यासोबतच नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेण्यावर लक्ष द्या. तुम्हाला लवकरच तुमच्या शरीरात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. तब्येतीची काळजी घ्या. 
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cumin water : लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्या जिऱ्याचं पाणी, आरोग्यासाठी आहे फायदेशीर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement