advertisement

Riteish Deshmukh : माझी बायको..! व्हॅलेंटाईनच्या आधीच रोमँटिक झाला रितेश, जेनिलिया वहिनीसाठी स्पेशल पोस्ट

Last Updated:
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया नेहमीच त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात. रितेशनं जेनिलियासाठी लिहिलेली स्पेशल पोस्ट पाहिली का?
1/8
व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. प्रेमात पडलेले सगळेच त्यांचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच रितेश देशमुखनं व्हॅलेटाईन डेच्या आधीच जेनिलियासाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे.

2/8
रितेश-जेनिलिया नेहमीच सोशल मीडियावर त्यांचं प्रेम व्यक्त करत दिसतात. व्हॅलेंटाईनच्या आधी रितेशनं जेनिलियासाठी खास पोस्ट लिहिली आहे. जेनिलियावरचं प्रेम रितेशनं खुलेपणानं व्यक्त केलं आहे. 

3/8
रितेश आणि जेनिलिया यांच्या लग्नाला काही दिवसांआधीच 14 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं दोघांनीही त्यांच्या लग्नातील काही अनसीन फोटो शेअर केले होते. दोघांच्या लग्नाला इतकी वर्षे उलटली तरी त्यांच्या नात्यातील गोडवा आणि ताजेपणा कायम आहे. 

4/8
रितेशनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय,
रितेशनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "अगदी 24 वर्षांपूर्वी आपली मनं एकमेकांना भेटली आणि पुन्हा कधीच दूर गेली नाहीत. तू माझं सुरक्षित ठिकाण आहेस, माझी सगळ्यात भन्नाट सफर आहेस, माझं अलगद साकारलेलं स्वप्न आहेस."
advertisement
5/8
 "मला आयुष्यभरासाठी निवडल्याबद्दल थॅक्यू. माझी मैत्रीण, माझं प्रेम, माझी बायको… मी तुझ्यावर न संपणारं, वेड्यासारखं प्रेम करतो."

6/8
रितेशची ही पोस्ट समोर येताच सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. अनेकांनी या जोडीला 'कपल गोल्स' म्हटलं. सेलिब्रिटी मित्रांनीही हार्ट इमोजी आणि शुभेच्छा देत प्रेम व्यक्त केलं.

7/8
रितेश आणि जेनिलिया पहिल्यांदा सनम तेरी कसम या सिनेमाच्या शूटींगदरम्यान भेटले. हा दोघांचा पहिला सिनेमा होता. दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.  आज ते दोन मुलांचे आई-वडील आहेत. बिझी करिअर असूनही ते कुटुंबाला प्राधान्य देतात. सोशल मीडियावर त्यांच्या मजेदार रील्स, व्हिडीओ आणि एकमेकांसोबतचे क्षण शेअर करत असतात. 

8/8
रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास तो सध्या बिग बॉस मराठी 6 होस्ट करत आहे. रितेशच्या होस्टिंगला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. महाराष्ट्राचा लाडका भाऊ अशी रितेशची नवी ओळख सर्वांना आवडतेय. 

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement