advertisement

पुणेकरांनो सावधान! ड्रेनेज दुरुस्तीसाठी आले अन् 7 कोटींचा 'डाका'; निवृत्त अधिकाऱ्यासोबत धक्कादायक घटना

Last Updated:

या प्रकरणाची सुरुवात नवी पेठेतील एका भाड्याच्या घरापासून झाली. तक्रारदाराच्या भाडेकरूने ड्रेनेजच्या कामासाठी संदीप चव्हाण नावाच्या व्यक्तीला बोलावले होते.

निवृत्त अधिकाऱ्यासोबत धक्कादायक घटना (AI Image)
निवृत्त अधिकाऱ्यासोबत धक्कादायक घटना (AI Image)
पुणे : पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी मोठे जाळे विणल्याचे समोर आले आहे. ड्रेनेज लाईन दुरुस्तीच्या एका साध्या कामाचे निमित्त करून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील एका सेवानिवृत्त अतिरिक्त संचालकाला तब्बल ६ कोटी ७० लाख ३७ हजार ५०० रुपयांना लुटण्यात आले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात ६१ वर्षीय अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. प्रकरणात संदीप चव्हाण, आदित्य चव्हाण, जितेन सोळंकी यांच्यासह बनावट बँक मॅनेजर आणि न्यायाधीश बनलेल्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सुरुवात नवी पेठेतील एका भाड्याच्या घरापासून झाली. तक्रारदाराच्या भाडेकरूने ड्रेनेजच्या कामासाठी संदीप चव्हाण नावाच्या व्यक्तीला बोलावले होते. त्याने आपण महानगरपालिकेचा अधिकारी असल्याचे सांगून ६५ हजार रुपयांत स्वतंत्र ड्रेनेज लाईन टाकण्याचे आमिष दाखवले. मात्र, एकदा का हा अधिकारी जाळ्यात अडकला की आरोपींनी त्यांच्या भोवती खोट्या नाट्याचा विळखा घट्ट केला. कधी मशिन डिपॉझिटच्या नावाखाली, तर कधी महापालिका चलनाच्या बहाण्याने त्यांनी पैसे उकळण्यास सुरुवात केली.
advertisement
हद्द तर तेव्हा झाली जेव्हा आरोपींनी तक्रारदाराला धमकावण्यासाठी चक्क बँक अधिकारी, पोलीस आणि न्यायाधीशांचे बनावट अवतार धारण केले. अटकेची भीती दाखवून आणि भावनिक दबाव टाकून त्यांनी मुलाचे ऑपरेशन, मृत्यू आणि न्यायालयीन खर्चाची खोटी कारणे सांगितली. जून २०२५ पर्यंत चाललेल्या या थरारामध्ये तक्रारदाराने आपली आयुष्यभराची पुंजी गमावली. पैसे परत मिळतील या आशेवर आणि कायदेशीर कारवाईच्या भीतीपोटी हे निवृत्त अधिकारी आरोपींनी सांगितल्यानुसार कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करत राहिले. पुण्याच्या इतिहासातील ही एक मोठी आणि डोळे उघडणारी फसवणूक ठरली असून, सध्या पोलीस या टोळीचा कसून शोध घेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो सावधान! ड्रेनेज दुरुस्तीसाठी आले अन् 7 कोटींचा 'डाका'; निवृत्त अधिकाऱ्यासोबत धक्कादायक घटना
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement