advertisement

IND vs NAM T20 : संजू सॅमसन ओपनिंगला! टीम इंडियामध्ये तीन मोठे बदल, कोण IN, कोण Out? पाहा कशी असेल Playing 11

Last Updated:

IND vs NAM T20 Playing 11 : वॉशिंग्टन सुंदरच्या समावेशामुळे भारतीय टीमची बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही विभागात ताकद वाढणार आहे. फिरकीला पोषक असलेल्या दिल्लीच्या मैदानावर त्याची भूमिका महत्त्वाची ठरेल.

IND vs NAM T20 Playing 11
IND vs NAM T20 Playing 11
India vs Namibia Playing 11 Prediction : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आज भारत आणि नामीबिया यांच्यात होणाऱ्या महत्त्वाच्या मॅचपूर्वी भारतीय 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. टीम इंडियाने आपला सराव पूर्ण केला असून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या या मॅचसाठी महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. वॉशिंग्टन सुंदर आजच्या मॅचमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज असून त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

किशनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम

वॉशिंग्टन सुंदरच्या समावेशामुळे भारतीय टीमची बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही विभागात ताकद वाढणार आहे. फिरकीला पोषक असलेल्या दिल्लीच्या मैदानावर त्याची भूमिका महत्त्वाची ठरेल. दुसरीकडे, विकेटकीपर बॅटर ईशान किशनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. कालच्या सरावावेळी जसप्रीत बुमराहचा एक वेगवान यॉर्कर बॉल ईशानच्या डाव्या पायावर लागला होता. त्यामुळे तो आजच्या मॅचमध्ये खेळणार की नाही, याचा अंतिम निर्णय टॉस वेळीच घेतला जाईल. ईशानच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला आजच्या मॅचमध्ये संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
advertisement

बुमराह तापातून पूर्णपणे सावरला

वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह तापातून पूर्णपणे सावरला असून तो आजच्या मॅचमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. बुमराह परतल्यामुळे गेल्या मॅचमध्ये 3 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजला मात्र बाहेर बसावे लागणार आहे. सिराजने चांगली कामगिरी केली असली तरी, बुमराहसारख्या अनुभवी बॉलरला संघात स्थान देण्यासाठी त्याला वगळण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
advertisement

डिस्चार्ज मिळाला असला तरी...

दरम्यान, सलामीवीर अभिषेक शर्माला पोटाच्या इन्फेक्शनमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला डिस्चार्ज मिळाला असला तरी तो आजही पूर्णपणे फिट नसल्यामुळे आजची मॅच खेळणार नाही. त्यामुळे ओपनिंगमध्ये ईशान किंवा संजू यांच्यापैकी कोणीतरी एकाला संधी दिली जाईल. आजच्या मॅचमध्ये संजू सॅमसनचे पुनरागमन पाहणे चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरेल. अभिषेक आणि ईशान यांच्या फिटनेस समस्यांमुळे सॅमसनकडे आपली जागा पक्की करण्याची ही सुवर्णसंधी असेल.
advertisement
टीम इंडियाची संभाव्य इलेव्हन : संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NAM T20 : संजू सॅमसन ओपनिंगला! टीम इंडियामध्ये तीन मोठे बदल, कोण IN, कोण Out? पाहा कशी असेल Playing 11
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement