पितळेच्या वस्तू वाढवतील घराची शोभा, इथं आहे सर्वात स्वस्त मार्केट
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सध्याच्या काळात तांब्या पितळेच्या भांडी आणि वस्तूंकडे लोकांचा कल वाढतोय. मराठवाड्यातील या प्रसिद्ध मार्केटमध्ये सर्व वस्तू उपलब्ध आहेत.
छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर: पूर्वी रोजच्या वापरात असणारी तांब्या पितळेची भांडी आता दुर्मिळ झाली आहेत. मात्र, आरोग्यासाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या या भांड्यांकडे पुन्हा लोकांचा कल वाढतोय. सोबतच घरात वापरायच्या तांब्या-पितळेच्या विविध वस्तूंनाही मागणी वाढत आहे. यामध्ये पितळेची आरती, समई, मूर्तीं आवर्जून घेतली जाते. आपणालाही या वस्तू खरेदी करायच्या असतील तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या वस्तूंचं खास मार्केट असून एकाच ठिकाणी स्वस्तात मस्त वस्तू भेटतात.
छत्रपती संभाजीनगरमधील भांडी बाजार प्रसिद्ध असून या ठिकाणी पितळेच्या सर्व वस्तू भेटतात. या ठिकाणी नैवेद्यासाठी किंवा देवासाठी लागणाऱ्या वस्तू, पूजेचे ताट आणि भांडी उपलब्ध आहेत. तसंच शो साठी लागणाऱ्या सर्व वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. यामध्ये भरपूर अशा शो साठी लागणाऱ्या मुर्त्या आहेत. मूर्तीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती, गौतम बुद्धांची मूर्ती, शिवाजी महाराज, साईबाबा, गणपती बाप्पा, अशा सगळ्या देवी देवतांच्या मुर्त्या इथे उपलब्ध आहेत.
advertisement
दिवा आणि समईचे विविध प्रकार
विशेष म्हणजे इथे तुम्हाला दिव्यांमध्ये भरपूर असे प्रकार बघायला भेटतात. यामध्ये समई देखील आहेत. विविध प्रकारच्या समई, दिवे या ठिकाणी उपलब्ध आहेत. यात पेशवाई समई, केरला समई, काशी केरला मोर डिझाईन असलेली समई आदी प्रकारच्या समई या ठिकाणी मिळतील. पाच इंचांपासून ते सात फुटांपर्यंतचा समई या ठिकाणी मिळेल. तर दिव्यांमध्ये प्याली दिवा, गणपती दिवा, लक्ष्मी दिवा, माणिक दिवा हे सुद्धा दिव्याचे प्रकार येथे उपलब्ध आहेत. हे दिवे तुम्ही पंचवीस रुपयांपासून ते पंचवीस हजार पर्यंत खरेदी करू शकतात.
advertisement
विविध शोच्या वस्तू उपलब्ध
घरामध्ये लागणारा शोच्या वस्तू येथे भरपूर उपलब्ध आहेत. त्यामध्ये विंटेज कार, वेगवेगळ्या मुर्त्या, घरात लागणारे लटकन वगैरे सगळं तुम्हाला इथे भेटून जाईल. ते नगावर किंवा किलो वर सुद्धा खरेदी करू शकता. तसंच शोसाठी लागणारे हत्ती दोनशे ग्रॅम पासून ते 200 किलो उपलब्ध आहेत. आमच्याकडे तुम्हाला सर्व प्युअर पितळेच्या वस्तू भेटतील. विशेष म्हणजे आमच्याकडे शोसाठीचा भरपूर वस्तू उपलब्ध आहेत. ज्या खूप जुन्या असून कुठेही भेटणार नाहीत. त्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता, असे विक्रेत्या संगिता पातुरकर सांगतात.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
October 01, 2023 12:02 PM IST