IRCTC Rann Of Kutch Tour : प्रेयसीसोबत येथे घालवा सुंदर क्षण.. आयआरसीटीसीचं कच्छ आणि भुजसाठी खास टूर पॅकेज

Last Updated:

IRCTC Rann Of Kutch Tour Package : ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कच्छ महोत्सव तुमच्यासाठी खास अनुभव ठरू शकतो. येथील पांढऱ्या वाळवंटातील अद्भुत सौंदर्य, संस्कृती आणि इतिहास अनुभवायचा असेल तुम्ही कच्छला भेट देऊ शकता. आयआरसीटीसीने पर्यटकांसाठी रण ऑफ कच्छ आणि भुज एअर पॅकेज नावाने एक खास टूर पॅकेज सुरू केले आहे.

पॅकेजमध्ये काय काय समाविष्ट असेल?
पॅकेजमध्ये काय काय समाविष्ट असेल?
मुंबई : ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांचा आनंद वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आयआरसीटीसीकडून CHRISTMAS & NEW YEAR SPECIAL RANN OF KUTCH & BHUJ AIR PACKAGE (WMA84B) सुरू करण्यात आले आहे. गुजरातमधील पांढऱ्या वाळवंटातील भव्यता, कच्छी संस्कृती, लोककला आणि ऐतिहासिक वारसा अनुभवण्याची संधी या पॅकेजद्वारे मिळणार आहे. रण उत्सवामुळे निर्जन मीठाचे वाळवंट रंगीबेरंगी सांस्कृतिक केंद्रात रूपांतरित होते. हा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरू शकतो.
पॅकेजचा तपशील
या विशेष टूर पॅकेजमध्ये भुज, व्हाईट रण ऑफ कच्छ आणि धोलावीरा या ठिकाणांचा समावेश आहे. गुजरात सरकारतर्फे आयोजित करण्यात येणारा रण उत्सव हा या टूरचा मुख्य आकर्षणबिंदू आहे. याच भागातील धोरडो गावाला संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन संस्थेकडून “बेस्ट टूरिझम व्हीलेज” म्हणून गौरवण्यात आले आहे. भुज शहरातील ऐतिहासिक राजवाडे, स्मृतिवन आणि सांस्कृतिक ठेवा या टूरला वेगळी ओळख देतात.
advertisement
किती दिवसांचे आहे पॅकेज?
हे पॅकेज एकूण 3 रात्री आणि 4 दिवसांचे आहे. ख्रिसमससाठी 24 डिसेंबर 25 ते 27 डिसेंबर 25 आणि 25 डिसेंबर 25 ते 28 डिसेंबर 25, तर नववर्षासाठी 30 डिसेंबर 25 ते 02 जानेवारी 26 आणि 31 डिसेंबर 25 ते 03 जानेवारी 26 या तारखांमध्ये हे पॅकेज उपलब्ध आहे. प्रवासाचा विमानाने असेलआण यात तुम्या भोजन व्यवस्था समाविष्ट असेल.
advertisement
कसा असेल संपूर्ण प्रवास?
मुंबईहून सकाळी 06:50 वाजता एअर इंडियाच्या विमानाने भुजकडे उड्डाण होऊन 08:05 वाजता भुज येथे आगमन होते. पहिल्या दिवशी व्हाईट रण रिसॉर्टमध्ये मुक्काम, सूर्यास्त दर्शन आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येतो. दुसऱ्या दिवशी व्हाईट रण येथील सूर्योदय, धोलावीरा येथील सिंधू संस्कृतीचे अवशेष आणि कालो डुंगर येथील सूर्यास्त अनुभवता येतो. तिसऱ्या दिवशी भुज शहरातील प्रमुख स्थळांना भेट दिली जाते. चौथ्या दिवशी सकाळी भुजहून मुंबईकडे परतीचे उड्डाण होऊन टूरची सांगता होते.
advertisement
काय काय पाहता येणार?
या टूरमध्ये व्हाईट रण ऑफ कच्छमधील सूर्यास्त व सूर्योदय, धोलावीरा येथील युनेस्को जागतिक वारसा स्थळ, कालो डुंगर, स्मृतिवन भूकंप स्मारक आणि संग्रहालय, आयना महाल, प्राग महाल आणि मांडवी बीच या ठिकाणांना भेट देता येते. कच्छी लोकनृत्य, संगीत आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव हा या प्रवासाचा अविस्मरणीय भाग ठरतो.
advertisement
पॅकेजचा प्रतिव्यक्ती खर्च
या पॅकेजसाठी प्रतिव्यक्तीनुसार निश्चित करण्यात आला आहे. सिंगल ऑक्युपन्सीसाठी 53,700 रुपये, डबल ऑक्युपन्सीसाठी 41,500 रुपये, तर ट्रिपल ऑक्युपन्सीसाठी 40,700 रुपये इतका खर्च आहे. 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी बेडसह आणि बेडशिवाय रुपये 36,300, तर 23 महिन्यांवरील आणि 5 वर्षांखालील मुलांसाठी 32,300 रुपये इतका दर आहे.
पॅकेजमध्ये काय काय समाविष्ट असेल?
या टूर पॅकेजमध्ये मुंबई ते भुज आणि भुज ते मुंबई रिटर्न विमानप्रवास, व्हाईट रण रिसॉर्टमध्ये 1 रात्रीचा आणि भुज येथे 2 रात्रींचा मुक्काम, 1 लंच, 2 नाश्ते आणि 2 डिनर, एक विशेष गाला डिनर, एसी कोच किंवा टेम्पो ट्रॅव्हलरद्वारे स्थानिक प्रवास व दर्शन, प्रवास विमा आणि जीएसटी यांचा समावेश आहे.
advertisement
पॅकेज कसे बुक कराल?
या विशेष टूरचे बुकिंग आयआरसीटीसीच्या अधिकृत पर्यटन कार्यालयांमार्फत करता येते. मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर येथील आयआरसीटीसी कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष संपर्क साधता येईल. तसेच swathis.poojary@irctc.com या ईमेलवर किंवा 8287931886 या क्रमांकावर कॉल, एसएमएस किंवा अथवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही सविस्तर माहिती आणि बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करता येते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
IRCTC Rann Of Kutch Tour : प्रेयसीसोबत येथे घालवा सुंदर क्षण.. आयआरसीटीसीचं कच्छ आणि भुजसाठी खास टूर पॅकेज
Next Article
advertisement
BMC Election : ‘BMC ELECTION IS NOT…’ पोस्टवरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थेट पत्र
‘BMC ELECTION IS NOT…’ वरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थे
  • ‘BMC ELECTION IS NOT…’ पोस्टवरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थे

  • ‘BMC ELECTION IS NOT…’ पोस्टवरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थे

  • ‘BMC ELECTION IS NOT…’ पोस्टवरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थे

View All
advertisement