कोणी फळं खावी, कोणी फळांचा रस प्यावा? आहारतज्ज्ञांनी दिलं उत्तर
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
काहीजण सांगतात, फळांचा रस पिण्यापेक्षा ताजी फळं खावी, तरच त्यातले पोषक तत्त्व पुरेपूर मिळतात. मग नेमकं काय खावं आणि काय प्यावं, हा मोठा प्रश्नच पडतो.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : फळं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ वारंवार देतात. त्यातही हंगामी फळं खाल्ली तर उत्तम. परंतु काहीजण म्हणतात, अख्ख फळ खाण्यापेक्षा त्याचा रस काढून प्यावा. तर, काहीजण सांगतात, फळांचा रस पिण्यापेक्षा ताजी फळं खावी, तरच त्यातले पोषक तत्त्व पुरेपूर मिळतात. मग नेमकं काय खावं आणि काय प्यावं, हा मोठा प्रश्नच पडतो. त्यामुळे याबाबत आहारतज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊया.
advertisement
आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, फळं सर्वांनीच खायला हवी, पण ती सालीसकट खाणं जास्त फायदेशीर असतं. सफरचंद, अंजीर ही फळं आपण तशी खाऊ शकतो. जेव्हा आपण फळं चावतो तेव्हा त्यात आपली लाळ मिसळते जे अत्यंत चांगलं असतं. त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित व्हायला मदत मिळते. आजारी लोकांसाठीसुद्धा रस पिण्यापेक्षा अख्ख फळं खाणं फायदेशीर असतं.
advertisement
परंतु लक्षात घ्या, फळं खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून, कापून घ्यावी. जी व्यक्ती तंदुरुस्त आहे तिनंच फळांचा रस प्यावा, तोही 50 ते 60 एमएलपेक्षा जास्त नाही. शिवाय सकाळचा नाश्ता झाल्यानंतर रस पिणं उत्तम मानलं जातं. ज्या व्यक्तीची जीवनशैली खूप धावपळीची आहे किंवा सकाळच्या नाश्त्यानंतर काही खायला वेळ नसेल, अशा व्यक्तीनं फळांचा रस घ्यायलाच हवा.
advertisement
तसंच प्रत्येक व्यक्तीनं दिवसभरात 300 ग्रॅम एवढीच फळं खावी. विशेषतः संत्र आणि अननसासारखी आंबट फळं खावी. त्यातून अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात मिळतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
July 01, 2024 3:37 PM IST