Food : मुंबईकरांनो,ही खास पाणीपुरी ट्राय केलीत का?कधीही न चाखलेली जांभळ्या रंगाची पाणीपुरी 'या' ठिकाणी मिळते

Last Updated:

Mumbai Street Food : मुंबईतील बोरिवली येथे मिळणारी जांभळी पाणीपुरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. बेरीपासून बनवलेल्या गोड पाण्यामुळे ही पाणीपुरी चवीला वेगळी आणि खास आहे.

News18
News18
मुंबई : पाणीपुरी हा देशभरातील लोकांचा आवडता पदार्थ आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागांत तिला पुचका, गोलगप्पा, बताशा अशा नावांनी ओळखले जाते. प्रत्येक ठिकाणी तिची चव आणि बनवण्याची पद्धत थोडीफार वेगळी असते. कुठे आंबट पाणी, कुठे तिखट, तर कुठे गोडसर पाण्यासोबत पाणीपुरी दिली जाते.
advertisement
मुंबईतील खाद्यप्रेमींसाठी मोठी मेजवानी!
मुंबईत सहसा पुदिन्याचे किंवा जलजीऱ्याचे हिरव्या रंगाचे पाणी वापरले जाते. मात्र आता मुंबईत एक वेगळ्याच प्रकारची पाणीपुरी चर्चेत आली आहे. बोरिवलीतील चौपाटी वाइब्स या ठिकाणी जांभळ्या रंगाची पाणीपुरी मिळते. इथे पाणीपुरीसाठी वापरले जाणारे पाणी पुदिना किंवा लिंबूपासून नाही, तर बेरी फळांपासून तयार केले जाते. त्यामुळे पाणी जांभळ्या रंगाचे आणि चवीला गोड असते. हा अनोखा प्रकार पाहण्यासाठी आणि चाखण्यासाठी दररोज संध्याकाळी मोठी गर्दी होते.
advertisement
या पाणीपुरीमध्ये नेहमीच्या बटाट्याच्या भाजीऐवजी उकडलेले मूग आणि बुंदीचा वापर केला जातो. त्यामुळे ही पाणीपुरी हलकी, रसाळ आणि वेगळी लागते. विशेषतहा मुलांमध्ये ही पाणीपुरी खूप लोकप्रिय आहे. एका प्लेटची किंमत 50 रुपये आहे.
याशिवाय मुंबईतील वांद्रे भागात अल्को पाणीपुरी देखील प्रसिद्ध आहे. ही मुंबईतील सर्वात महागडी पाणीपुरी मानली जाते. एका प्लेटची किंमत 90 रुपये असून त्यात फक्त 6 पाणीपुरी मिळतात. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी येथे पाणीपुरी खाण्यासाठी आले आहेत. वेगळ्या चवीमुळे ही पाणीपुरी सोशल मीडियावरही चर्चेत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Food : मुंबईकरांनो,ही खास पाणीपुरी ट्राय केलीत का?कधीही न चाखलेली जांभळ्या रंगाची पाणीपुरी 'या' ठिकाणी मिळते
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement