Healthy Food : स्वाद आणि आरोग्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन, दादर एक खास रेस्टॉरंट, स्वस्तात मिळतेय हेल्दी फूड

Last Updated:

अनेकांना असं वाटतं की हेल्दी खाणं म्हणजे चव विसरावी लागते. पण हे समीकरण पूर्णपणे खोडून काढणारं एक खास रेस्टॉरंट दादरमध्ये आहे.

+
स्वाद

स्वाद आणि आरोग्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन — दादरमधील Tossfit

मुंबई : आजकाल आपण सगळे आपल्या आरोग्याबाबत अधिक सजग झालो आहोत. जंक फूडला रामराम करत हेल्दी खाण्याचा आग्रह वाढला आहे. मात्र अनेकांना असं वाटतं की हेल्दी खाणं म्हणजे चव विसरावी लागते. पण हे समीकरण पूर्णपणे खोडून काढणारं एक खास रेस्टॉरंट दादरमध्ये आहे. या ठिकाणी स्वाद आणि आरोग्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन बघायला मिळेल.
टस फिट हे रेस्टॉरंट फक्त हेल्दीच नव्हे, तर चविष्ट पदार्थांसाठीही ओळखलं जातं. टस फिटचं सगळ्यात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे इथे पारंपरिक स्ट्रीट फूडला एक हेल्दी ट्विस्ट दिला जातो. तुम्हाला इथे खिमा पाव मिळेल पण नेहमीसारखा नव्हे. इथला खिमा ऑलिव ऑइल मध्ये बनवला जातो तसेच जो पाव असतो तो बनतो मल्टीग्रीन पाव आहे. ज्यात फायबर्स जास्त आणि अजिबात मैदा नाही हा खिमा पाव 239 चा आहे. त्याचप्रमाणे इथला पास्ता सुद्धा ग्लुटेन फ्री आहे. मैद्याचा वापर न करता खास हेल्दी घटकांपासून बनवलेला हा पास्ता स्वादिष्ट असूनही पचायला हलका आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे हा पास्ता फक्त 349 ला आहे. तसेच चिकन व्रेप 259 ला आहे. व्हेज पिझ्झा 349 ला आहे.
advertisement
टस फिटमध्ये अजून काय मिळतं?
प्रोटीन रिच सूप्स, सुपरफूड्सने भरलेली सलाड्सलो कॅलोरी स्मूदीज शुगर फ्री डेझर्ट्स हे पदार्थ मिळतील
जर तुम्हाला हेल्दी खाणं आणि चव यांचा परफेक्ट बॅलन्स हवा असेल, तर टस फिटला एकदा नक्की भेट द्या. दादरच्या गडबडीतसुद्धा इथे एक वेगळीच शांतता आणि आरोग्यदायी अनुभव तुम्हाला मिळेल.
मराठी बातम्या/Food/
Healthy Food : स्वाद आणि आरोग्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन, दादर एक खास रेस्टॉरंट, स्वस्तात मिळतेय हेल्दी फूड
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement