आजारांशी दोन हात करतं लाल-पिवळ फळ, पावसात खाल तर ताकदवर व्हाल

Last Updated:

अपायकारक रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास त्यांचा उपयोग होतो. या फळाच्या नियमित सेवनामुळे शरीरावरील सूज कमी होते. त्यामुळे अनेक तक्रारी आपोआप नियंत्रणात येतात.

News18
News18
पावसाळा सुरु झाला की अनेक प्रकारच्या आजारांचा सीझन सुरु होतो. मात्र, या दिवसांत आहारा-विहाराची नीट काळजी घेतली तर मात्र पावसाळ्यात आजारपणं येत नाहीत आणि सीझन छान एंजॉय करता येतो. या मोसमात काही उत्तम फळं मिळतात. ती खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यापैकी एक फळ म्हणजे प्लम. यालाच आलुबुखार असंही म्हणतात.
आलुबुखार हे फळ म्हणजे पोषक घटकांचा उत्तम स्रोत आहे. हे फळ अवघ्या काही महिन्यांसाठी बाजारात येतं मात्र त्या काळात त्याचं केलेलं सेवन तुम्हाला संपूर्ण पावसाळाभर पुरेल एवढी ऊर्जा देतं. काही आजारांवर उपचारांमध्येही या फळाचा वापर करतात. हेल्दलाईनच्या रिपोर्टनुसार आलुबुखारमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यात अनेक चांगली ॲंटिऑक्सिडंट्सही असतात. त्यामुळे कितीतरी गंभीर आजारांचा धोका कमी होतो. सुकी आलुबुखारही चवीला चांगली लागतात. त्यांचाही आपल्या तब्येतीसाठी उपयोग होतो. आलुबुखारमुळे पेशींचं नुकसान नियंत्रणात राहातं. अपायकारक रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास त्यांचा उपयोग होतो. या फळाच्या नियमित सेवनामुळे शरीरावरील सूज कमी होते. त्यामुळे अनेक तक्रारी आपोआप नियंत्रणात येतात.
advertisement
या फळांमध्ये भरपूर फायबर्स असल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो. ज्यांना पोटाचे त्रास आहेत, पोट साफ होत नाही असं वाटतं त्यांनी आलुबुखार जरुर खावं. चवीला गोड असलं तरी आलुबुखार मधुमेहींसाठीही उपयुक्त ठरतात. त्यातील फायबर्स ब्लड शुगरची पातळी योग्य ठेवायला मदत करतात. मात्र, मधुमेहींनी त्याचं सेवन योग्य प्रमाणात करणं आवश्यक आहे. आलुबुखारमुळे हाडांचं आरोग्य सुधारतं. हाडं मजबूत होतात. त्यामुळे ऑस्टियोपोरॉसिससारखे त्रास कमी होऊ शकतात. हाडांची झीज थांबण्यासही त्यांची मदत होते. हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांसाठी हे फळ अत्यंत गुणकारी आहे. या दोन्ही त्रासांवर आलुबुखार सेवनाने नियंत्रण येतं. रक्तवाहिन्यांसंबंधी आजार होण्याचा धोका कमी होतो. हृदयाचं आरोग्य चांगलं राहातं. व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फासबर्स भरपूर असल्यामुळे निरोगी व्यक्तींसाठीही हे फळ खाणं उपयुक्त ठरतं. फिटनेसबाबत जागरुक असलेल्या व्यक्तींनी आलुबुखार बाजारात असताना त्यांचं सेवन जरुर करावं. अलीकडच्या काळात त्या-त्या मोसमात मिळणारी फळं आणि अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. त्याबरोबरच थोडी काळजी घेतली तर प्रत्येक ऋतुत तुम्ही निरोगी राहू शकता.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आजारांशी दोन हात करतं लाल-पिवळ फळ, पावसात खाल तर ताकदवर व्हाल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement