Diet for Fat loss : पोटावरची चरबी कमी होण्यासाठी खास टिप्स, आहार - जीवनशैलीतले बदल आवश्यक
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
सकाळी रिकाम्या पोटी काही आरोग्यदायी पेय प्यायल्यानं चयापचय क्रिया वाढू शकते, परंतु केवळ यामुळेच पोटाची चरबी नाहीशी होणार नाही. यासोबत संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करूनच तुम्ही तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता आणि तंदुरुस्त राहू शकता.
मुंबई : वजन कमी करणं, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. सकाळी कोणतं पेय प्यायलं की फॅट लॉस होईल ? सडपातळ होण्यासाठी काय करावं यासाठी काही उपाय आपल्या घरातच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, पोटाची चरबी कमी करून निरोगी आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला तुमची दिनचर्या आणि आहार सुधारावा लागेल.
अनेकदा लोक सोशल मीडियावर किंवा इतरत्र सकाळी रिकाम्या पोटी ही गोष्ट प्यायल्यानं पोटाची चरबी कमी होण्याचे दावे केले जातात. पण अनेकदा या दाव्यांमध्ये तथ्य नसतं.
काही खास टिप्स
- 1. योग्य आहार - आपल्या आहारात प्रथिनं, फायबरचा समावेश करा. साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. जास्त पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेट राहील.
- 2. नियमित व्यायाम - कार्डिओ व्यायाम जसं की धावणं, पोहणं किंवा सायकल चालवणं या कृती पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.
- 3. स्ट्रेंथ ट्रेनिंग देखील प्रभावी उपाय आहे.
- 4. ताण व्यवस्थापन - दररोज किमान 7-8 तास झोप घ्या. तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योग करा.
- 5. जेवणाचं वेळापत्रक नीट ठेवा.
- 6. रात्रीचं जेवण हलकं ठेवा आणि झोपण्याच्या २-३ तास आधी खा.
- 7. जीवनशैलीतील बदल: -धूम्रपान आणि मद्यपान टाळा, सकाळी लवकर उठण्याची सवय लावा आणि दिनचर्या नियमित ठेवा.
advertisement
सकाळी रिकाम्या पोटी काय प्यावं ?
- कोमट लिंबू पाणी: लिंबू पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करतं आणि चयापचय गतिमान करण्यास मदत करतं.
- कोमट पाणी आणि मध: मधासोबत पाणी प्यायल्यानं पचनक्रिया सुधारते आणि चरबी कमी होण्यास मदत होते.
- ग्रीन टी किंवा हर्बल टी: ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे चयापचय वाढवतात.
- ऍपल सायडर व्हिनेगर: 1-2 चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर एका ग्लास पाण्यात मिसळून प्यायल्यानं भूक कमी होते आणि पोटाची चरबी कमी होते.
advertisement
या गोष्टी लक्षात ठेवा:
- वजन, चरबी कमी करण्यासाठी वेळ आणि मेहनत लागते.
- कोणत्याही एका पेयावर किंवा उपायावर अवलंबून राहणं योग्य नाही.
- सकाळी रिकाम्या पोटी काही आरोग्यदायी पेय प्यायल्यानं चयापचय क्रिया वाढू शकते, परंतु केवळ यामुळेच पोटाची चरबी नाहीशी होणार नाही. यासोबत संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करूनच तुम्ही तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता आणि तंदुरुस्त राहू शकता.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 03, 2025 7:24 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Diet for Fat loss : पोटावरची चरबी कमी होण्यासाठी खास टिप्स, आहार - जीवनशैलीतले बदल आवश्यक