Rice Toner : तांदुळाचं पाणी - चेहऱ्याच्या त्वचेसाठी सर्वोत्तम उपाय, घरीही बनवू शकता राईस टोनर

Last Updated:

चेहऱ्यासाठीच्या अनेक उपायांपैकी एक म्हणजे राईस टोनर. तांदुळाचं पाणी वापरुन तुम्हाला घरबसल्या चेहऱ्यावरची चमक कायम राखता येईल. त्वचेची काळजी घेण्यासाठी तांदूळ वेगवेगळ्या प्रकारे वापरला जाऊ शकतो.

News18
News18
मुंबई : चेहऱ्यासाठीच्या अनेक उपायांपैकी एक म्हणजे राईस टोनर. तांदुळाचं पाणी वापरुन तुम्हाला घरबसल्या चेहऱ्यावरची चमक कायम राखता येईल. त्वचेची काळजी घेण्यासाठी तांदूळ वेगवेगळ्या प्रकारे वापरला जाऊ शकतो. जाणून घेऊया, तांदुळाचं टोनर कसं बनवता येईल.
अनेक कोरियन उत्पादनांमध्ये, तांदुळाचा समावेश केलेला आहे. महिला विशेषतः तांदळाच्या पाण्याचा टोनर म्हणून वापर करतात, ज्यामुळे त्वचेला चमक येते. पण, यासाठी कोणताही वेगळा तांदूळ आणण्यापेक्षा, तुम्ही घरी तांदुळाचं टोनर बनवून लावू शकता.
पाहूयात राईस टोनर कसा बनवला जातो -
advertisement
राईस टोनर घरी बनवण्यासाठी तुम्हाला फक्त 2 गोष्टी आवश्यक आहेत. अर्धा कप तांदूळ आणि एक चतुर्थांश कप पाणी. टोनर बनवण्याचा पहिला मार्ग म्हणजे तांदूळ पाण्यात टाकून ते भिजू द्यावं. अर्धा तास भिजत ठेवल्यानंतर गाळून तांदूळ वेगळे करा. तयार केलेले पाणी टोनरप्रमाणे चेहऱ्यावर लावता येतं.
advertisement
राईस टोनर बनवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तांदूळ पॅनमध्ये पाण्यात उकळणं. पाणी उकळल्यावर ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. हे पाणी कापसाच्या साहाय्यानं चेहऱ्यावर लावता येतं किंवा स्प्रे बाटलीत ठेवावं आणि सकाळ संध्याकाळ चेहऱ्यावर स्प्रे करावं.
advertisement
राईस टोनरचे फायदे -
रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर राइस टोनरही लावा. टोनरमुळे त्वचेवर दिसणारी वृद्धत्वाची लक्षणं दूर होतात. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी निघून जातात, डाग कमी होतात आणि निर्जीव त्वचेवर चमक येते.
advertisement
राइस टोनर मुरुम कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे., यामुळे त्वचेवर येणारे फोड आणि पिंपल्स कमी होतात. या टोनरमुळे छिद्र पडण्याची समस्या कमी होते, त्यामुळे त्वचेवर पुरळ येण्याची शक्यताही कमी होते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Rice Toner : तांदुळाचं पाणी - चेहऱ्याच्या त्वचेसाठी सर्वोत्तम उपाय, घरीही बनवू शकता राईस टोनर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement