Vision: या 5 गोष्टी आहेत डोळ्यांसाठी वरदान.. दृष्टी दीर्घकाळ चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा आणि संवेदनशील भाग आहे. बदलती जीवनशैली, तासनतास स्क्रीनसमोर बसणं आणि पोषणाचा अभाव यामुळे डोळ्यांच्या समस्या आजकाल वाढताना दिसतायत. अशावेळी आपली दृष्टी दीर्घकाळ टिकवून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
मुंबई: डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा आणि संवेदनशील भाग आहे. बदलती जीवनशैली, तासनतास स्क्रिनसमोर बसणं आणि पोषणाचा अभाव यामुळे डोळ्यांच्या समस्या आजकाल वाढताना दिसतायत. अशावेळी आपली दृष्टी दीर्घकाळ टिकवून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आहाराचा दृष्टीवर सर्वाधिक परिणाम होतो. आपण जे खातो त्याचा आपल्या डोळ्यांच्या आरोग्यावरही काही प्रमाणात परिणाम होतो.
पाहूयात दृष्टी कशी चांगली ठेवायची हे सांगणाऱ्या टिप्स
1. गाजर
डोळ्यांसाठी गाजर खूप फायदेशीर मानलं जातं. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळतं, डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी याची मदत होते. गाजराचा रस किंवा गाजर कच्चं खाल्ल्यानं डोळ्यांचा थकवा दूर होतो आणि दृष्टी सुधारते.
advertisement
2. बदाम
बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे मॅक्युलर डिजेनेरेशन (वय-संबंधित डोळ्याचे विकार) रोखण्यासाठी देखील उपयुक्त आहे. रोज 4-5 भिजवलेले बदाम खाणं डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं.
3. हिरव्या पालेभाज्या
पालक, मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. हे पोषक घटक डोळ्यांचे स्नायू मजबूत करतात आणि अतिनील किरणांपासून डोळ्यांचं संरक्षण करतात.
advertisement
4. आवळा
आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे, डोळ्यांच्या पेशी पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. आवळा कच्चा खाऊ शकतो किंवा त्याचा रस पिऊ शकतो.
5. मासे
ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स समृद्ध असलेले मासे, विशेषत: सॅल्मन आणि ट्यूना हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी वरदान आहेत. यामुळे ड्राय आय सिंड्रोम आणि डोळ्यांच्या इतर समस्या टाळता येतात. मासे खात नसाल तर तुम्ही जवस आणि चिया सीड्स खाऊ शकता.
advertisement
हे लक्षात ठेवा :
- पुरेशी झोप घ्या आणि डोळ्यांना विश्रांती द्या.
- दररोज 20-20-20 नियमांचं पालन करा. दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर पहा.
- आपले डोळे नियमितपणे तपासा.
- हानिकारक अतिनील किरणांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सूर्यप्रकाशात सनग्लासेस घाला.
- डोळे हा आपल्या शरीराचा खजिना आहे. त्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. तुमच्या दिनचर्येत या 5 गोष्टींचा समावेश करा आणि तुमची दृष्टी दीर्घकाळ निरोगी ठेवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 03, 2025 5:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Vision: या 5 गोष्टी आहेत डोळ्यांसाठी वरदान.. दृष्टी दीर्घकाळ चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त