प्रसूतीसाठी खर्च किती? पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणानंतर उपचारांच्या दरांवर प्रश्नचिन्ह! Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
प्रसूतीसाठी लागणाऱ्या उपचारांवरील खर्च आणि त्यात झालेल्या आर्थिक गैरप्रकारांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
पुणे : पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहेत. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. त्या प्रकारावरुन मंगेशकर रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. प्रसूतीसाठी लागणाऱ्या उपचारांवरील खर्च आणि त्यात झालेल्या आर्थिक गैरप्रकारांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. आज खासगी रुग्णालयांमध्ये सामान्य प्रसूतीसाठी सुमारे 50 हजार रुपये ते सिझेरियनसाठी दीड लाख रुपये पर्यंत खर्च येतो. काही ठिकाणी ही रक्कम यापेक्षाही अधिक आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करण्याआधीच अॅडव्हान्स रक्कम घेतली जाते. यामागे डॉक्टरांचे शुल्क, रुग्णालय व्यवस्थापनाचा खर्च, तसेच आधुनिक सोयी-सुविधा पुरवण्याचा भाग असतो. डॉक्टर वैजयंती पटवर्धन सांगतात की, हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणे, औषधे, तपासण्या, वॉर्डचे दर्जा, ऑपरेशन थिएटर यांसारख्या गोष्टींचा एकत्रित विचार करून बिल आकारले जाते.
advertisement
आधुनिक वैद्यकीय पद्धतीमुळे माता मृत्यूचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. पाच वर्षांपूर्वी भारतात हे प्रमाण 400 ते 500 प्रति लाख जन्म इतके होते, मात्र आता ते 100 च्या खाली आले आहे. हे बदल वेळेवर निदान, नियोजनबद्ध गर्भधारणा, आणि नियमित तपासण्यांमुळे शक्य झाले आहेत.
advertisement
प्रसूतिपूर्व काळात वेळोवेळी सोनोग्राफी, रक्त चाचण्या, रक्तदाब मापन, बाळाची वाढ आदी गोष्टी तपासणे आवश्यक ठरते. योग्य काळजी घेतल्यास धोके टाळता येतात आणि आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुरक्षित राहते.
या पार्श्वभूमीवर, आई होणं हे निसर्गाचं वरदान असलं तरी त्यासाठी लागणारा खर्च सामान्य कुटुंबासाठी आर्थिक आव्हान ठरतो, हे सत्य नाकारता येणार नाही, असं डॉक्टर वैजयंती पटवर्धन सांगतात.
advertisement
view comments
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 07, 2025 8:38 AM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
प्रसूतीसाठी खर्च किती? पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणानंतर उपचारांच्या दरांवर प्रश्नचिन्ह! Video







