हिवाळ्यात रात्री झोपेतच ब्रेन हॅमरेज किंवा हार्ट अटॅक का येतो? डाॅक्टरांचं कारण ऐकाल, तर चकीत व्हाल
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
हिवाळ्यात रात्रीच्या 3 ते 6 या वेळेत हृदयविकार आणि स्ट्रोकचे प्रमाण वाढते. रक्तदाब अचानक वाढल्याने वृद्ध आणि मध्यम वयाच्या लोकांना अधिक धोका असतो. अचानक उठू नये, चांगली रक्ताभिसरण प्रक्रिया ठेवावी आणि गरम कपडे परिधान करावेत, असे डॉक्टरांचे मत आहे.
जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, हिवाळ्यात रात्रीच्या एका विशिष्ट वेळी हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज होण्याचा धोका सर्वाधिक असतो, तर तुम्हाला विश्वास बसेल का? काहींना कदाचित याची कल्पना असेल, पण बहुतांश लोकांना हे माहीतच नसतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका व ब्रेन हॅमरेजच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते.
डॉ. देवेश चॅटर्जी, गेल्या पंधरा वर्षांपासून काम करणारे फॅमिली फिजिशियन सांगतात की, हिवाळ्यात हृदयविकार व ब्रेन हॅमरेजच्या घटनांमध्ये खूप मोठी वाढ होते. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात अशा घटनांचा आकडा जास्त असतो. विशेषतः वयोवृद्ध आणि मध्यमवयीन लोक याचा जास्त बळी ठरतात.
हिवाळ्यात अचानक वाढणारा रक्तदाब हे यामागचं मुख्य कारण आहे. वृद्ध व मध्यमवयीन लोकांमध्ये रक्तदाबाचा त्रास जास्त प्रमाणात आढळतो, त्यामुळे त्यांना हृदयविकार व ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता जास्त असते. डॉ. देवेश यांच्या मते, हिवाळ्यात हृदयविकार व ब्रेन हॅमरेज होण्याचा सर्वाधिक धोका रात्री 3 ते पहाटे 6 वाजेपर्यंत असतो. या काळात सर्व वयोगटातील लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी.
advertisement
तज्ज्ञ सांगतात की, रात्री उबदार पांघरुणातून उठताना चुकूनही लगेच उभं राहू नका. हिवाळ्यात थंड हवेमुळे रक्त जड होऊ शकतं. अचानक उभं राहिल्यास रक्त पुरवठा योग्य प्रकारे हृदय व मेंदूपर्यंत पोहोचत नाही. यामुळे हृदयविकार व ब्रेन हॅमरेजचा धोका वाढतो.
बेडवरून उठण्यापूर्वी काही वेळ बसून राहा. अंदाजे 40 सेकंद बसून राहा व नंतर 1 मिनिट पाय खाली टाका. उठण्याआधी उबदार कपडे परिधान करा. रक्तप्रवाह योग्य राहील व झटका येण्याचा धोका कमी होईल. हिवाळ्यात रात्रीच्या या वेळेत (3 ते 6 वाजता) विशेष काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वृद्ध व मध्यमवयीन व्यक्तींनी थंडीत हृदयविकार व ब्रेन हॅमरेज टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.
advertisement
हे ही वाचा : पृथ्वीवर सूर्य उतरणार! सर्वांना मिळणार 24 तास वीजच वीज, जाणून घ्या न्यूक्लियर फ्यूजन प्लांट
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2024 1:00 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
हिवाळ्यात रात्री झोपेतच ब्रेन हॅमरेज किंवा हार्ट अटॅक का येतो? डाॅक्टरांचं कारण ऐकाल, तर चकीत व्हाल










