Health Tips : रोज गरम पाण्याने आंघोळ करताय? फायदे आणि तोटे काय? आधी हे वाचा
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अंघोळी साठी गरम पाणी वापरण्याचे जसे काही फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. ते कितपत गरम पाणी वापरतात यावरच त्याचे फायदे-तोटे अवलंबून असतात.
अमरावती : हिवाळा सुरू झाला की, अनेकजण गरम पाण्याने अंघोळ करायला सुरुवात करतात. तर काहींना बाराही महिने अंघोळीसाठी गरम पाणी हवं असतं. पण अंघोळीसाठी गरम पाणी वापरण्याचे जसे काही फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. ते कितपत गरम पाणी वापरतात यावरच त्याचे फायदे-तोटे अवलंबून असतात. अंघोळीसाठी गरम पाणी वापरण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत जाणून घेऊ.
हलक्या गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे
गरम पाण्याने अंघोळ केल्यास रक्ताभिसरण सुधारते. हलके गरम पाणी शरीरातील रक्तप्रवाह सुधारते व स्नायूंना आराम देते. थकवा आणि स्नायूंचा ताण कमी होतो. दिवसभराच्या थकव्याने आलेला जडपणा किंवा स्नायूंचे दुखणे दूर होते. हलक्या गरम पाण्याने अंघोळ केल्यास थंडीपासून बचाव होतो. शरीर उबदार राहते, सर्दी-खोकल्यापासून काही प्रमाणात संरक्षण मिळते. तसेच त्वचेवरील छिद्रे उघडतात. त्यामुळे घाम आणि धूळ साचलेले घटक सहज निघून जातात. हे आहेत हलक्या गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे.
advertisement
अति गरम पाण्याने अंघोळ केल्यास होणारे तोटे
अति गरम पाणी अंघोळीसाठी वापरल्यास त्वचेचा ओलावा नष्ट होतो. त्वचा कोरडी होते. खाज येते आणि सोलते. तसेच केसांचे नुकसान होते. केस कोरडे आणि तुटक होतात. तसेच केसांची चमक हरवते. अति गरम पाण्याने त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जातात. ज्यामुळे त्वचेची नैसर्गिक संरक्षण क्षमता कमी होते. तसेच संवेदनशील त्वचेला इजा होते. ज्यांना एक्झिमा, ड्राय स्किन, किंवा स्कॅलिंगची समस्या आहे, त्यांना अति गरम पाणी हानिकारक ठरू शकतं.
advertisement
गरम पाण्याने अंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती?
कोमट पाणी म्हणजे शरीराला उबदार वाटेल पण हातावर ओतल्यावर जळजळ होणार नाही इतकं गरम पाणी अंघोळीसाठी असायला हवं. जमत आल्यास थंड पाण्याने अंघोळ करणे केव्हाही फायदेशीर आहे. गरम पाण्याने अंघोळीनंतर ओल्या त्वचेला मॉइश्चरायझर किंवा खोबरेल तेल लावणे फायदेशीर ठरते. अति गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. त्यामुळे अनेक फायदे होतील.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Nov 01, 2025 4:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : रोज गरम पाण्याने आंघोळ करताय? फायदे आणि तोटे काय? आधी हे वाचा





