advertisement

Health Tips : मिठाचा शरीरावर कसा परिणाम होतो? कमी खाणे चांगले की वाईट? तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

आपण आहारामधून मीठ कमी केलं तर त्यामुळे आपला उच्च रक्तदाब हा नियंत्रणात राहतो. काहीजण म्हणतात जर मीठ कमी केलं तर त्यामुळे वाईट परिणाम देखील होतात.

+
‎आहारामधून

‎आहारामधून मीठ कमी केल्याने काय परिणाम होतात 

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही कधी असा विचार केला आहे का, जर तुम्ही आहारामधून मीठ कमी केलं तर त्याचा तुमच्या शरीरावरती काय परिणाम होतो? कारण की लोक असे म्हणतात जर आपण आहारामधून मीठ कमी केलं तर त्यामुळे आपला उच्च रक्तदाब हा नियंत्रणात राहतो. काहीजण म्हणतात जर मीठ कमी केलं तर त्यामुळे वाईट परिणाम देखील होतात. पण जर आपण आहारामध्ये मीठ कमी केल्याने त्याचे काय परिणाम होतात म्हणजे चांगले की वाईट हेच? आपल्याला आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलेलं आहे.
‎आपल्याकडे कुठलाही पदार्थ चमचमीत करायचा असेल तर त्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात मीठ हे वापरतो. पण जे डब्ल्यूएचओ आहे त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने दिवसभरामध्ये फक्त पाच ग्रॅम एवढं मीठ खायचे म्हणजेच एक चिमूटभर एवढं मीठ आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे.
advertisement
पण या उलट आपल्याकडे भरपूर प्रमाणात मीठ हे खाण्यात येतं जसं की पापड, लोणचं किंवा इतरही कुठल्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असतं आणि ते आपल्यासाठी खूप हानिकारक असतं. तसेच आपल्यापैकी काही जणांना सवय असते की ज्यांना अगोदर वरतून मीठ टाकूनच जेवण करायचं तर ते देखील खूप हानिकारक आहे.
जास्त मीठ आपण जर आहारामध्ये घेतलं तर यामुळे तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, त्यासोबतच हृदयविकाराचा धोका वाढतो, त्यासोबतच किडनीवरती देखील याचा वाईट परिणाम होतो. असे वाईट परिणाम आपल्यावरती होतात. त्यामुळे जेवण करताना तुम्ही कमीत कमी मीठ खाण्याचा प्रयत्न करावा किंवा जर तुम्हाला चमचमीत लागत असेल तर तुम्ही ताक किंवा लिंबू हे तुमच्या आहारात घेतलं तर नक्कीच याचे चांगले परिणाम तुमच्यावरती होतील. त्यामुळे आहारामध्ये कमीत कमी मिठाचा वापर करावा जेणेकरून तुमचं आरोग्य हे चांगल राहील असं आहार तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : मिठाचा शरीरावर कसा परिणाम होतो? कमी खाणे चांगले की वाईट? तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement