Winter Health Tips थंडीत ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी , किचन मधले ‘हे’ पदार्थ ठरतील वरदान
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Winter Care Home remedies हिवाळ्यात अनेकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या किचनमधल्या साध्या पदार्थांचा वापर करून स्वत:ला स्वस्थ आणि निरोगी ठेऊ शकता.
Winter Care Home remedies: हिवाळ्यात वातावरण बदलामुळे अनेकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. सर्दी, खोकल्या सारख्या साध्या आजारांपासून ते दमा, अस्थमा आणि श्वसनाच्या अन्य विकारांचा सामना थंडी करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या किचनमधल्या साध्या पदार्थांचा वापर करून स्वत:ला स्वस्थ आणि निरोगी ठेऊ शकता.
तुळशीची पानं
तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे जर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर तुम्ही तुळशीची पानं स्वच्छ धुवून चावून खाऊ शकता. जर तुम्हाला ग्रीन टी आवडत असेल तर तुम्ही तुळशीचा पानांचा चहा बनवू शकता. यात थोडीशी हळद टाकल्यास हा औषधी चहा तुमचं सर्दी-खोकल्यापासून रक्षण करेल
ओव्याचं पाणी
जर तुम्हाला पचनासंबंधीच्या तक्रारी असतील तर तुम्ही ओव्याचं पाणी पिऊ शकता. ओव्यामध्ये थायमॉल नावाचा घटक असतो जो पचन सुधारायला मदत करतो. तुम्ही ओवा उकळून ते गरम पाणी पिऊ शकता किंवा रात्रभर ओवा भिजत ठेऊन सकाळी ती पाणी पिऊ शकता. यामुळे तुम्हाला व्याच्या बिया गॅस आणि अपचनापासून आराम मिळेल
advertisement
त्रिफळा पावडर
जर तुम्हाला ओव्याच्या पाण्याने फरक नाही पडला तर तुम्ही त्रिफळा पावडरा वापर करू शकता. त्रिफळा पचन सुधारण्यासोबतच पोट साफ करायलाही मदत करतो. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यासोबत प्यायल्याने सकाळी पोट साफ होतं.
advertisement
आलं आणि मध
आलं आणि मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो, ज्यामुळे घसा खवखवणे आणि खोकल्यापासून आराम मिळतो. एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्या घसादुखी पासून आराम मिळेल
advertisement
लिंबू आणि मध
जर तुम्हाला वजन आणि पोटाभोवती वाढलेली चरबी कमी करायची असेल तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. यामुळे पचनक्रीया सुधारून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.
लसूण
view commentsलसणामध्ये ॲलिसिन नावाचे तत्व असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. सकाळी उठल्यावर एक लसणाची पाकळी खाल्याने रक्तदाब नियंत्रिक राहून हृदयविकाराचा धोका टाळता येतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 28, 2024 7:19 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Health Tips थंडीत ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी , किचन मधले ‘हे’ पदार्थ ठरतील वरदान


