Soaked Dates Benefits: थंडीत उपाशीपोटी खा खजूर; दूर पळेल दमा आणि अस्थमा

Last Updated:

Soaked Dates Health Benefits: खजुरात फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6 आणि आयर्न असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जाणून घ्या खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती ते

प्रतिकात्मक फोटो : थंडीत उपाशीपोटी खा खजूर; दूर पळेल दमा आणि अस्थमा
प्रतिकात्मक फोटो : थंडीत उपाशीपोटी खा खजूर; दूर पळेल दमा आणि अस्थमा
Soaked Dates Benefits: सुकामेव्यात अनेक पोषकतत्वे असतात ती शरीरासाठी फायद्याची असतात. मात्र अनेकदा सुकामेवा हा चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने खाल्ला जातो, त्यामुळे त्याचे हवे तसे फायदे मिळत नाहीत. खजुरात फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6 आणि आयर्न असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जाणून घेऊयात खजूर खाण्याचे फायदे आणि नेमका कोणत्या वेळी खजूर खावा.

थंडीपासून होईल बचाव

हिवाळ्यात जर तुम्ही खजूर खाल्ले तर खजुरात असलेल्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमुळे शरीरला चांगली उर्जा मिळून थंडीपासून तुमचा बचाव होऊ शकतो. दररोज उठल्यावर 2-3 भिजवलेले खजूर खाणं फायद्याचं ठरू शकतं. ऊर्जा मिळते. खजुरमध्ये ग्लुकोज, फ्रक्टोज आणि सुक्रोज आढळतात ज्यामुळे तुम्हाला लगेच उर्जा मिळते. सकाळी रिकाम्या पोटी खजूर खात असाल तर तुम्हाला फ्रेश वाटते.
advertisement

दमा, अस्थमा, श्वासरोगांवर परिणामकारी

हिवाळ्यातल्या हवामान बदलाचा आणि प्रदूषणाचा फटका अनेकांना बसतो.थंडीत अनेकांना दम्याचा किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. जर तुम्हाला पण दम्याचा त्रास होत असेल तर भिजवलेले खजूर खाल्लेत तर तुम्हाला श्वसनरोगांपासून आराम मिळेल.
advertisement

हाडं मजबूत होतात

हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो.याशिवाय कधी मुकामार लागला असेल तर ते दुखणं थंडीत बळावू शकतं. खजुरांत असलेलं तांबं, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करतात. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो.. करावे.

बद्धकोष्ठतेपासून आराम

advertisement
तुम्हाला जर अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही सकाळी उठल्यावर खजूर खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. खजुरांमध्ये असलेल्या फायबर्समुळे पचनासाठी मदत होते.  खजूर थेट खाण्यापेक्षा रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी उठल्यास जास्त गुणकारी ठरतील.

वजन वाढण्यास फायदेशीर

खजुरांमध्ये असेलल्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात कॅलरीजचा पुरवठा होता. त्यामुळे तुम्हीजर वजन वाढवायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खजुराइतका फायदेशीर सुकामेवा दुसरा कोणता नाही.
advertisement
अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात असलेल्या शर्करेमुळे लगेच ताकद मिळते. तुम्ही जर सकाळी उपाशी पोटी 2 खजूर खाल्ले तर त्याचे दुप्पट फायदे होतील.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Soaked Dates Benefits: थंडीत उपाशीपोटी खा खजूर; दूर पळेल दमा आणि अस्थमा
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement