Winter Care Tips for Eyes हिवाळ्यात डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी; डोळे राहतील स्वस्थ आणि निरोगी

Last Updated:

Winter Care Tips for Eyes हिवाळ्यात डोळे कोरडे पडणे, लाल होणे, जड होणे, अश्रू गोठणे अशा तक्रारी वाढतात. त्यामुळे हिवाळ्यात डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून डोळ्यांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला नेत्रतज्ज्ञ देतात.

प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी
Winter Care Tips for Eyes हिवाळा सुरू झालाय. प्रदूषण आणि थंडीमुळे अनेक आजार वाढू लागलेत. अशावेळी डोळ्यांशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. डोळे कोरडे पडणे, लाल होणे, डोळे जड होणं, अश्रू गोठणे असे आजार सर्रासपणे हिवाळ्यात आढळतात. त्यामुळे हिवाळ्यात डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून डोळ्यांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला नेत्रतज्ज्ञ देतात.
दिवसातून 2 ते 3 वेळा डोळे धुवा
कडाक्याच्या थंडीचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे ज्या भागात तापमान कमी असतं अशा व्यक्तींना जर आधीच डोळ्यांचा त्रास असेल तर त्यांचे डोळे कोरडे पडणे किंवा सतत उडत राहण्याचा त्रास त्यांना सहन करावा लागू शकतो. यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो.अशा व्यक्तींनी त्यामुळे घराबाहेर पडताना किमान 3 वेळा डोळे धुवायला हवेत.
advertisement
घाबरू नका, काळजी घ्या
तज्ज्ञांच्या मते थंडीमुळे अनेकांचे डोळे पाणावात. जेव्हा थंड हवा (कॉर्निया) बुबळांवर आदळते डोळ्यांमधून अश्रू वाहू लागतात. कारण सामान्य तापमानापेक्षा कॉर्नियाचं तापमान कमी होऊ नये म्हणून अश्रू येतात. त्यामुळे डोळे उबदार राहतात. याशिवाय डोळ्यात पाणी आल्यामुळे डोळ्यांमध्ये असलेली घाण दूर होतेच मात्र त्या बरोबरच डोळ्यांचा कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. त्यामुळे डोळे ओलावणे किंवा डोळ्यांमध्ये पाणी येणं सर्वसामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाहीये. मात्र तुमच्या डोळ्यांमध्ये सतत पाणी येत असेल तर एकदा नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करून घ्या.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Care Tips for Eyes हिवाळ्यात डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी; डोळे राहतील स्वस्थ आणि निरोगी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement