IPL 2026 : 25 कोटी दिले, पण 25 रनही नाही केले... रहाणेसोबत पहिल्या सामन्यातच फ्रॉड झाला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात केकेआरने पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 220 रन केले. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्या अर्धशतकांमुळे केकेआरला मोठ्या स्कोअरपर्यंत मजल मारता आली.
मुंबई : आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात केकेआरने पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 220 रन केले. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्या अर्धशतकांमुळे केकेआरला मोठ्या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. अजिंक्य रहाणेने 40 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने 67 रन केले तर अंगक्रिश रघुवंशीने 29 बॉलमध्ये 51 रनची खेळी केली, यात 2 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता.
रहाणे आणि रघुवंशीशिवाय फिन ऍलनने 17 बॉलमध्ये 37 आणि रिंकू सिंगने 21 बॉलमध्ये नाबाद 33 रनची खेळी केली. मुंबईकडून शार्दुल ठाकूर सगळ्यात यशस्वी ठरला. शार्दुलने 4 ओव्हरमध्ये 39 रन देऊन 3 विकेट घेतल्या, तर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला एक विकेट मिळाली.
25 कोटींचा स्टार फेल
आयपीएल 2026 च्या लिलावामध्ये केकेआरने ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनला 25.20 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. याचसोबत ग्रीन आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला, पण पहिल्या सामन्यातच कॅमरून ग्रीन अपयशी ठरला. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आल्यानंतर ग्रीनने एक रन काढून स्वत:चं खातं उघडलं, यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये त्याने गगनचुंबी सिक्स मारला आणि मग आणखी एक फोर मिळवली.
advertisement
ग्रीन मोठा स्कोअर करेल असं वाटत असतानाच शार्दुल ठाकूरने त्याला स्लो बॉल बाऊन्सर टाकला, त्यामुळे ग्रीन त्याचा शॉट चुकला आणि शरफेन रदरफोर्डने बाऊंड्री लाईनवर त्याचा कॅच घेतला. 10 बॉलमध्ये एक फोर आणि एक सिक्स मारून ग्रीनने फक्त 18 रनच केले.
बॉलिंगला परवानगी नाही
कॅमरून ग्रीन हा ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आहे, पण फिटनेसच्या समस्येमुळे ग्रीनला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बॉलिंग टाकयला परवानगी मिळाली नाही, त्यामुळे तो फक्त बॅटर म्हणूनच मैदानात उतरत आहे. मागच्या काही महिन्यांपासून ग्रीन हा फॉर्मसाठी संघर्ष करत आहे. आधी ऍशेस आणि त्यानंतर टी-20 वर्ल्ड कपमध्ये कॅमरून ग्रीनला एक एक रन काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. ऑस्ट्रेलियातील एका पत्रकाराने ग्रीनला त्याच्या फॉर्मबद्दल विचारलं असता ग्रीनने त्याच्यासोबत बाचाबाची केली, यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. इतका संघर्ष करत असतानाही केकेआरने ग्रीनवर विश्वास दाखवून त्याच्यावर 25.20 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता पुढच्या सामन्यांमध्ये ग्रीन त्याला मिळालेली ही रक्कम सार्थ ठरवेल, अशी केकेआरची अपेक्षा असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 11:06 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 25 कोटी दिले, पण 25 रनही नाही केले... रहाणेसोबत पहिल्या सामन्यातच फ्रॉड झाला!







